महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime News: धावत्या लोकलमध्ये विनयभंगाचे सत्र सुरू; तरूणाने अश्लील चाळे आणि शिवीगाळ करत केला तरूणीची छेड काढण्याचा प्रयत्न - molested in local train

पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने 24 वर्षीय तरूणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानक येताच एका तरुणाने तिची अश्लील शिवीगाळ आणि चाळे करत छेड काढण्याचा प्रयत्न केला.

Mumbai Crime News
लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग

By

Published : Jun 30, 2023, 11:53 AM IST

मुंबई :पश्चिम रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा धावत्या लोकलमध्ये विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. सात दिवसांपूर्वीच सीएसएमटी रेल्वे स्थानकात एका तरुणीवर अतिप्रसंग झाला होता. त्यानंतर महिला सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र, अद्याप महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अजून सुटलेला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. धावत्या लोकलमध्ये एका तरूणाने २४ वर्षीय तरूणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेप्रकरणी तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु : या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र, 24 तास उलटून गेले तरी आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रांच आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे. रेल्वे स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज पोलीस तपासत आहे.


पीडित तरूणीवर लैंगिक अत्याचार :सहा दिवसांपूर्वी सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये तरुणीवर अतिप्रसंग बेतला होता. सात दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान गंभीर घटना घडली. पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर इथे एका परीक्षेला जात होती.ट्रेन सुरु होताच आरोपी डब्ब्यात चढला. मुलगी एकटीच प्रवास करत होती. आरोपीने पीडित तरूणीवर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सीएसएमटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला मस्जिद बंदर येथून अटक करण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. Buldana Crime : सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  2. Sexual Assaulting Minor Girl: पनवेल रेल्वे स्थानक परिसरात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड
  3. Beed Crime News : अंध महिलेच्या 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

ABOUT THE AUTHOR

...view details