मुंबई Raped On Doctor Woman : महिला डॉक्टरवर नराधमानं बलात्कार करुन पीडितेला ब्लॅकमेल करुन पैसे उकळल्यानं खळबळ उडाली. ही घटना गावदेवी परिसरात घडली असून याप्रकरणी नराधमावर गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे.
- बॅडमिंटन क्लबमध्ये झाली होती ओळख :पीडित डॉक्टर महिला ही आपल्या पतीसोबत झालेल्या कौटुंबीक कलहामुळे वेगळी राहते. त्यामुळे ही महिला ताडदेव परिसरात असलेल्या एका बॅडमिंटन क्लबमध्ये जात होती. या ठिकाणी तिची या 38 वर्षीय नराधमासोबत ओळख झाली होती. या ओळखीतून नराधमानं महिला डॉक्टरसोबत मैत्री केली.
भेटायला बोलावून केला बलात्कार :डॉक्टर महिला पतीपासून वेगळी राहत असल्यानं या नराधमानं तिच्याकडं तिच्या खासगी आयुष्यावर गप्पा मारायला सुरुवात केली. आपण तुमच्या वादावर तोडगा काढू, असं त्यानं तिला आश्वासन दिलं. त्यातूनच तिला भेटायला बोलावलं. या नराधमानं 20 ऑगस्टला मरीन ड्राईव्ह परिसरात असलेल्या एका क्लबमध्ये भेटल्यानंतर गप्पा मारुन मद्यपान केलं. त्यानंतर त्यानं तिला घरी सोडायला गेल्यानंतरही महिलेच्या घरी दोघांनी मद्यपान केलं. त्यानंतर दारूच्या नशेत महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला. त्यानंतर