महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime News : नात्याला काळीमा! सासऱ्यानं खिडकीतून घुसून सुनेवर केला अत्याचार; गुन्हा दाखल - Mumbai Rape News

Mumbai Crime News : सासऱ्यानेच आपल्या सुनेवर तिच्या बेडरुममध्ये घुसून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलीय. याप्रकरणी महिलेनं दिलेल्या तक्रारीवरुन सासऱयाविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mumbai Crime News
Mumbai Crime News

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 9:03 AM IST

मुंबई : Mumbai Crime News : मुंबईत नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. सासऱ्यानेच आपल्या सुनेवर खिडकीतून तिच्या बेडरुममध्ये घुसून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी सुनेच्या तक्रारीवरुन पंतनगर पोलीस ठाण्यात (Pantnagar Police Station) सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

बेडरुममध्ये घुसून बलात्कार :याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित महिला ही आरोपी असलेल्य कुटुंबातील सून आहे. घाटकोपर येथे पतीसह ती राहत होती. पीडित महिलेचा पती, सासरे, सासू आणि दोन नणंदा यांनी तक्रारदार महिलेशी घरातील छोट्या मोठया कारणांवरून वाद घालून, मारहाण करुन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. अशातच सासऱ्यानं 10 जून 2023 राजी रात्री स्वयंपाक घराच्या खिडकीतून बेडरूममध्ये प्रवेश करत सुनेवर जबरदस्तीनं शारीरिक अत्याचार केले.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार तिचा जबाब नोंदवून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. संपूर्ण कुटुंब सुनेचा छळ करत असून सासर्‍यानं लैंगिक छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून, सासू-सासरे, पती आणि दोन नणंदा याचा आम्ही शोध घेत आहोत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे - रवीदत्त सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंतनगर पोलीस ठाणे

विविध कलमान्वये गुन्हा दाखल : याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी पीडित महिलेने दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगानं पीडितेचा जबाब नोंद केलाय. तसेच महिलेच्या पती, सासरा, सासू आणि दोन नणंदा यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 498(अ), 376(2)(फ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील हे पाचही आरोपी वॉन्टेड असल्याचे पोलिसांनी सांगितलंय. पंतनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. Jalna Crime News: बकऱ्या चोरी करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरानं केल धक्कादायक कृत्य, एक जण ताब्यात
  2. Gang Rape In Thane: डोंबिवलीत १९ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार
  3. Mumbai Crime News : धावत्या टॅक्सीमध्ये अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार; दोन तासात आरोपींना बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details