मुंबईMumbai Air Hostess Murder : मुंबईतील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मरोळ येथील एका सोसायटीत 24 वर्षीय एअर होस्टेसचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवई पोलिसांनी अवघ्या आठ तासांमध्ये आरोपीला पवई तुंगा परिसरातून अटक केलीय, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे. विक्रम अठवल (वय 40) असं आरोपीचं नाव आहे.
आरोपीची रूपलवर वाईट नजर :आरोपी विक्रम अठवल हा हाउसकीपिंगचे काम करत असल्याची माहिती समोर येतेय. त्याची गेल्या अनेक दिवसांपासून रूपलवर वाईट नजर होती. रूपाली तिची बहीण आणि बहिणीच्या प्रियकरासोबत एकाच फ्लॅटमध्ये राहत होती. मात्र काल रूपल घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन रूपलवर अतिप्रसंग आणून तिची हत्या तर केली नाही ना, या अनुषंगाने पवई पोलीस तपास करत आहेत. अद्याप मृत तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे तिचे लैंगिक शोषण अथवा तिचा कशा पद्धतीने हत्या करण्यात आली होती, याबाबत माहिती देण्यास पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी नकार दिलाय. मृत तरुणीचे आई-वडील छत्तीसगड येथून मुंबईत आले असून मुलीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मुख्य कारण कळू शकेल, असं त्यांनी सांगितलंय.
गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह : पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय तरुणीचा तिच्या फ्लॅटमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून दोन किलोमीटरवर असलेल्या मरोळ परिसरात ही तरुणी राहत होती. तरुणीच्या पालकांनी मोबाईलवर कॉल करून ग्रुपला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. (Mumbai Air Hostess Murder) मात्र तिनं फोन उचलला नाही. त्यावेळी पालकांनी रूपलच्या मैत्रिणीला फोन करून रूपलची चौकशी करण्यास सांगितली. त्यावेळी रुपलची मैत्रीण तिच्या फ्लॅटवर गेली. बेल वाजवून देखील रूपलने दरवाजा उघडला नाही. रूपलच्या फ्लॅटला आतमधून लॉक असल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी रूपल मृत अवस्थेत दिसून आली. घटनास्थळी पवई पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाले आहेत.