महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime News : घरात घुसून मायलेकींवर जीवघेणा हल्ला करून आरोपीनं केली आत्महत्या - accused attack on mother daughter

Mumbai Crime News : मुंबईतील चेंबूरच्या साईबाबा नगरात एक खळबळजनक घटना समोर आलीय. या घटनेत आरोपीनं घरात घुसून मायलेकींवर चाकूनं जीवघेणा हल्ला करत स्वतः आत्महत्या केलीय. यातील जखमी मायलेकींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai Crime News
Mumbai Crime News

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 7:37 AM IST

हेमराज राजपूत, पोलीस उपायुक्त

मुंबई : Mumbai Crime News : मुंबईतील चेंबूरच्या साईबाबा नगरात आई आणि मुलीवर चाकूनं वार करुन आरोपीनं स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिलीय. या घटनेत जखमी झालेल्या आई आणि मुलीला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, आरोपीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय.

आरोपीचा भाजीविक्रीचा व्यवसाय :पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या साईबाबा नगरमध्ये पीडित महिला तिच्या पती, मुलांसोबत राहते. महिलेचा पती चेंबूर भाजी मंडईत कपडे विकण्याचं काम करतो. आरोपी देखील भाजी विक्रीचं काम करत होता. कोरोनादरम्यान आरोपीची या महिलेशी ओळख झाली. तेव्हापासून आरोपी हा महिलेच्या घरी जेवणासाठी येत होता. दरम्यान मे २०२३ मध्ये आरोपीचे उत्तर प्रदेशातील आझमगढ या त्याच्या मुळ गावी लग्न होतं. या लग्नाला पीडित महिलाही गेली होती. लग्नानंतर आरोपी एकटाच मुंबईला परतला. येथे आल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून त्यानं महिलेच्या घरी जाणं बंद केलं होतं.

महिलेच्या घरात घुसून तिच्यावर चाकू हल्ला :दरम्यान, बुधवारी महिलेचा पती भाजी मार्केटला गेला असता, रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी घरी आला. नंतर आरोपीनं घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यावेळी महिलेची मुलगीही घरात होती. त्यानंतर आरोपीनं खिशातून चाकू काढून महिलेच्या मानेवर वार केले. यात महिला जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडली. दरम्यान, आईला वाचवण्यासाठी आलेल्या मुलीच्या मानेवरही आरोपीनं चाकूनं वार केले. ही महिला कशीतरी जखमी अवस्थेत आपल्या मुलीसह घरातून बाहेर आली आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर आरोपीनंही आत्महत्या केली.

जखमी मायलेकींवर उपचार सुरू : पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. जखमी मायलेकीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime News : धावत्या टॅक्सीमध्ये अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार; दोन तासात आरोपींना बेड्या
  2. Mumbai Crime News : राष्ट्रवादीच्या आमदाराला टॅक्सीचालकाची जीवे मारण्याची धमकी, भररस्त्यात टॅक्सीतून उतरवलं
  3. Mumbai Crime : चालत्या लोकलमध्ये तरुणीशी अश्‍लील चाळे, आरोपी तरुणाला अंधेरी रेल्वे स्थानकावर अटक

ABOUT THE AUTHOR

...view details