महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jaipur Mumbai Train firing : आरोपी आरपीएफ जवानाला आज तीन वाजता न्यायालयात करण्यात येणार हजर, गोळीबाराचे काय आहे प्रकरण?

जयपूर-मुंबई रेल्वेत आरपीएफ जवानाने गोळीबार केल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Jaipur to Mumbai Train firing
दहिसर ते मीरा एक्सप्रेसमध्ये गोळीबार

By

Published : Jul 31, 2023, 8:21 AM IST

Updated : Jul 31, 2023, 1:50 PM IST

आरपीएफ जवानाच्या गोळीबारात चार ठार

मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातून एक मोठी बातमी समोर येते आहे. जयपूर-मुंबई रेल्वेत आरपीएफ जवानाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात आरपीएफ एएसआयसह चार प्रवाशी ठार झाले आहेत. कॉन्स्टेबल चेतन कुमार याने एकेएमधून १२ गोळ्या झाडत तीन ठिकाणी गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. एएसआय टिका राम मीना असे मृत आरपीएफ एएसआयचे नाव आहे. कादर हुसैन (नालासोपारा), अख्तर अब्बास अली (शिवडी) व अशी अब्दुल कादिर ( शिवडी) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. बी५ मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर पॅन्ट्रीमध्ये एक व एस ६ मध्ये एका जणाचा मृत्यू झाला आहे.

पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर धावत्या जयपूर एक्स्प्रेस रेल्वेमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलने अचानक गोळीबार केला. त्याने एक आरपीएफ एएसआय आणि इतर तीन प्रवाशांना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर दहिसर स्टेशनजवळ रेल्वेमधून उडी मारली. आरोपी कॉन्स्टेबलला त्याच्या शस्त्रासह ताब्यात घेण्यात आल्याचे पश्मिम रेल्वेने म्हटले आहे. ही थरारक घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत डीसीपी उत्तर जीआरपीला माहिती दिल्याचे रेल्वे संरक्षण दलाने म्हटले आहे. मृत झालेला सहाय्यक पोलीस निरीक्षक टीका राम मीना हा मूळचा राजस्थानचा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

आपआपसातील वाद झाल्यामुळे घडली घटना -जयपूर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे गुजरात राज्यातून पालघरमध्ये दाखल होताच गोळीबार झाला. या गोळीबारात चार जणांच्या मृत्यूसह काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. गोळीबार झाल्यानंतर एक्स्प्रेस मीरा-रोड दहिसर येथे थांबवण्यात आली होती. सध्या ही ट्रेन मुंबई सेंट्रल येथे दाखल झाली आहे. एक्सप्रेस ट्रेनचा नंबर 12957 असून गोळीबारानंतर रेल्वेत एकच गोंधळ उडाला. या गाडीतील कोच B-5 मध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. आरपीफ जवानाच्या आपआपसातील वाद झाल्यामुळे ही घटना घडली आहे.

मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू-आपल्या वरिष्ठाची हत्या केल्यानंतर आरपीएफ जवान चेतन कुमार थंड डोक्याने दुसर्‍या बोगीत गेला. त्याने अचानक तीन प्रवाशांना गोळ्या घातल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ अधिकाऱ्यांच्या मदतीने मीरा रोड येथे आरोपीला पोलिसांनी पकडले. जयपूर एक्स्प्रेसमधून मृतदेह बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. मृतांची (मृत प्रवासी) ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट -डीआरएम नीरज वर्मा म्हणाले, की सकाळी 6 वाजता आम्हाला गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. की, आमचे रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला असून त्यांना मदत दिली जाणार आहे. पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले, की आरपीएफ जवानाने वरिष्ठावर गोळीबार केल्याची घटना दुर्दैवी आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही त्याचा तपास करत आहोत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. आरोपी मीरा रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले आहे.

आरोपी हा उत्तर प्रदेशमधील रहिवाशी-आरोपी चेतन कुमारला दुपारी 3 वाजता बोरीवली कोर्टात हजर करणार येणार आहे. आरोपीने एआरमगन मधून गोळीबार केला असून एआरएम गन जप्त करण्यात आली आहे. आरोपी चेतन कुमारला भाईंदर पोलिसांनी अटक करून जीआरपीच्या ताब्यात दिले आहे. जीआरपीने आरोपी कॉन्स्टेबल चेतनला ताब्यात घेतले आहे. त्याची बोरिवली रेल्वे स्थानकात कसून चौकशी केली जात असल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग विभागाचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. आरोपी हा चेतन कुमार मूळ हा उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील आहे. तर तिघेही मृत हे नालासोपारा येथील रहिवाशी होते.

हेही वाचा-

  1. Barauni New Delhi Special Train : चुकीच्या सिग्नमुळे रेल्वेची दिशा चुकली.. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे टळला अपघात
  2. Jaipur to Mumbai Train firing : जयपूर-मुंबई रेल्वेत नेमका गोळीबार कसा झाला? रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती
Last Updated : Jul 31, 2023, 1:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details