मुंबई- पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर जमा होणाऱ्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची सुरुवात देवनार डम्पिंग ग्राऊंडपासून होणार आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. येत्या मे पासून या प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
देवनार डंपिंग ग्राऊंडवर सुमारे ३ हजार मेट्रीक टन इतक्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचे पालिकेचे नियोजन होते. मात्र, या प्रकल्पाच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे येथे दररोज जमा होणाऱ्या ६०० मेट्रीक टन इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे निश्चित झाले. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असून या प्रकल्पाच्या कामाचे आदेश येत्या १ मे पर्यंत दिले जाणार असल्याची माहिती पालिका आयक्त अजोय मेहता यांनी दिली.