महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 19, 2022, 7:05 PM IST

ETV Bharat / state

Mumbai Corona Update : मुंबईत सर्वात कमी २९ रुग्णांची नोंद; तर शून्य मृत्यू

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली असून ही लाट आटोक्यात आली आहे. ( Mumbai Corona Update ) यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेले काही दिवस १००च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. ( Corona Patients Reduced Mumbai ) सध्या गेल्या २ वर्षातील सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे. आज २९ नवीन रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ( Mumbai Corona Update March 2022 )

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली असून ही लाट आटोक्यात आली आहे. ( Mumbai Corona Update ) यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेले काही दिवस १००च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. ( Corona Patients Reduced Mumbai ) सध्या गेल्या २ वर्षातील सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे. आज २९ नवीन रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ( Mumbai Corona Update March 2022 ) मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ३१५ सक्रिय रुग्ण आहेत.

२९ नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत आज (१९ मार्च) २९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ५३४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार ६४२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३१५ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १७४४४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे.

९९.८ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या २९ रुग्णांपैकी २७ म्हणजेच ९३ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज २ रुग्णाना रुग्णालयात दाखल करावे लागले. एकाही रुग्णांला ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली नाही. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६,४९५ बेडस असून त्यापैकी ५० बेडवर म्हणजेच ०.२ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.८ टक्के बेड रिक्त आहेत.

हेही वाचा -Imtiaz Jalil : इम्तियाज जलील माझे वर्गमित्र मात्र, एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील : राजेश टोपे

असे झाले रुग्ण कमी -

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४, ११ मार्चला ५४, १२ मार्चला ३, १३ मार्चला ४४, १४ मार्चला २७, १५ मार्चला ५०, १६ मार्चला ४४, १७ मार्चला ७३, १८ मार्चला ४८, १९ मार्चला २९ रुग्णांची नोंद झाली आहे.

३५ वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च, १५ मार्च, १७ मार्च, १८ मार्च, १९ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ३५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात १७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

धारावीत २ सक्रिय रुग्ण -

धारावीत आज शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत आतापर्यंत एकूण ८६५२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८२३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीत सध्या २ सक्रिय रुग्ण आहेत. धारावीत दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर धारावी हॉटस्पॉट झाली होती. मात्र धारावी मॉडेल आणि केलेल्या उपाययोजना, नागरिकांची साथ यामुळे धारावीत अनेकवेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details