मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासात ९ हजार ४५१ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २८२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात २.९८ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. ४९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २० हजार ८१९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९८ हजार ७६६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ४२३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.
सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २०८० दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३३ टक्के इतका आहे. मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले होती. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली.