मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
Mumbai Coastal Road Name : मुंबई सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव; मुख्यमंत्र्यांची घोषणा - गेटवे ऑफ इंडिया
मुंबई सागरी महामार्ग (कोस्टल हायवेला) छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. तसेच मुंबईतील कोस्टल रोड परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात बोलत होते.
गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध :छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. युवा पिढीला हा ऐतिहासिक ठेवा प्रेरणादायी ठरेल. तसेच मुंबईतील कोस्टल रोड परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठा समाजाला सर्व सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक :मुंबईतल्या गेटवे ॲाफ इंडिया येथे पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी होतेय याचा अत्याआनंद आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक आहे. तसेच शिवशंभुरायांचे कार्य, योगदान जतन करणे ही आनंदाची गोष्ट आहे. देशभरात छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव पोहचवला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य केला जाईल. राज्य शासन त्याची तयारी करीत आहे, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, राजमाता जिजाऊ यांचे वंशज विजयराव जाधव, संयोजक या महोत्सवाला व्यासपीठावर उपस्थित होते.