मुंबई : चिराग वरैया यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली . ती पोलिसांनी जप्त केली. त्यात आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले. त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची माफी मागितली आहे. तसेच पत्नीला त्यांच्या मुलांची काळजी घेण्यास सांगितले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी इगतपुरीत येऊन मृतदेह ताब्यात घेतला.
वरैयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा :सोमवारी सकाळी चिराग यांचा ड्रायव्हर त्यांना घेण्यासाठी गेला तेव्हा त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी रिसॉर्ट मालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी चिराग हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले, असे पोलिसांनी सांगितले. मुंबईच्या भांडुप पोलिसांनी १० जानेवारी रोजी वरैयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांनी तपासात सहकार्य केले. मात्र, दुसऱ्यांदा चौकशीला बोलावले , तेव्हा चिराग हजर झाले नव्हते. उलटपक्षी चिराग यांना पैसे डबल करून देण्याच्या नावाखाली 84 लाख एका महिलेने मागितले. मात्र पैसे परत न केल्याने चिराग यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.