मुंबई - युतीच्या अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याबद्दल फक्तभारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच माहिती आहे, असे स्षष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा -'शिवसेनेचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी आग्रही'
आज (मंगळवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच-अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला युतीमध्ये ठरला नसल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसेच लवकरच भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पुढील घडामोडीबाबत चर्चा होणार आहे. आणि तेच याबाबत स्पष्टीकरण देतील, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यात शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली आहे. सध्या दोनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.