महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Ahmedabad Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्प रखडणार; जायकाची मंजुरी आवश्यक - Mumbai Ahmedabad Bullet Train

वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी रेल्वे स्थानकाचे काम पुढील महिन्यात जायका मंजुरी नंतर सुरू होणार आहे. पुढील 20 दिवसानंतर तांत्रिक बोली उघडल्या जाणार असून बुलेट ट्रेनच्या तांत्रिक बोली खुल्या होईपर्यंत पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे याच मैदानावर उद्घाटन करण्यात येत आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन

By

Published : Jan 17, 2023, 10:13 PM IST

बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत माहिती देताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

मुंबई :सरकारचा बहुचर्चित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग कधी पूर्ण होतो याची जनतेला उत्सुकता आहे. गुजरातमधील दादर नगर हवेली या ठिकाणी काम वेगाने प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रामध्ये अद्यापही काही कामे परिपूर्ण झाले नाही. त्यामुळे यासंदर्भात जायका मंजुरी नंतरच पुढची तांत्रिक बोली प्रक्रिया पुढील 20 दिवसानंतर सुरू होईल. दरम्यान बिकेसी संकुल मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रो तसेच विविध विकास प्रकल्पाचे उदघाटन करतील. बुलेट ट्रेन बाबत उद्घाटनासाठी अद्याप वाट पाहावी लागणार, असे सांगितले जात आहे.



तांत्रिक बोली शिवाय काम ठप्प : बुलेट ट्रेनच्या संदर्भात मुंबई ते अहमदाबाद या ठिकाणी विशेष करून जे उद्योग आणि व्यवसाय आहे. त्यामुळे या उद्योग व्यवसायिकांची देखील उत्कंठा आहे. मुंबई ही उद्योगांचे माहेरघर आहे. हिऱ्यापासून ते रासायनिक, पोलाद, बांधकाम क्षेत्र, प्रत्येकाचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय उद्योग करणाऱ्या जनतेचे देखील लक्ष बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे आहे. महाराष्ट्रामध्ये तरी हे काम धीम्या गतीने सुरू आहे. ज्या रीतीने गुजरात आणि दादर नगर हवेली या राज्यात शंभर टक्के भूसंपादन झाले त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक निविदा यांची बोली लावली गेली आणि त्यानंतर आर्थिक निविदांची बोली लावली गेली.

जायका म्हणजे काय ?: बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी उच्च पद अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही महाराष्ट्रामध्ये परिपूर्ण रीतीने भूसंपादन काम काही प्रमाणात बाकी आहे . त्यामुळे भूसंपादन झाल्याशिवाय तांत्रिक बोलींचे काम कसे पुढे जाईल. जायका म्हणजे जपान इंटरनॅशनल एजन्सी कोऑपरेशन ही जापान सरकारची वित्तपुरवठा करणारी सरकारी एजन्सी आहे, ही जेव्हा तांत्रिक प्रक्रियेंना मान्यता देईल. त्या मान्यतेनंतर तांत्रिक बोली खुल्या केल्या जातील. त्यानंतर त्याचे मूल्यमापन देखील होईल. ह्या प्रकल्पाला मविआ सरकारने खो घातला असा आरोप त्यावेळचे विरोधक आणि आजचे सत्ताधारी पक्षांनी केला होता.


तांत्रिक बोली पुढील 20 दिवसात : आत्ता बांद्रा कुर्ला संकुल येथे जे मैदान आहे त्या मैदानामध्येच बुलेट ट्रेन चे रेल्वे स्थानक होणार आहे आणि त्याला पॅकेज सी वन असे नाव राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाने दिलेले आहे. ज्याला आपण थोडक्यात पहिल्या टप्प्याचे काम असे म्हणू शकतो. या पहिल्या टप्प्याच्या कामामध्ये रेल्वे स्थानकाच्या संदर्भातील बोली पुढील वीस दिवसानंतर खुल्या केला जातील. तोपर्यंत जपान आंतरराष्ट्रीय सहकारी एजन्सी मान्यता ताई आणि ती मान्यता झाली की त्वरित या तांत्रिक बोली खुल्या केल्या जातील.

सी टू पॅकेज : बांद्रा रेल्वे स्थानकापासून ते ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा इथपर्यंतच्या कामाला टप्पा दोन अर्थात सी टू पॅकेज असे म्हटले जाते. यामध्ये समुद्राखालून भुयारी मार्ग शिळफाटा पर्यंत जाणार आहे. त्यामुळे त्या टनेल्स काम हे या वर्षाच्या अखेर सुरू होईल असे देखील सूत्रांच म्हणणे आहे. त्याचे कारण असे की टप्पा तीन हा शिळफाटा ते गुजरात राज्याच्या सीमेपर्यंतच्या कामासाठी आहे, तो त्याच्यानंतर होईल परंतु वांद्रे कुर्ला संकुलातील जे मैदान आहे ज्या ठिकाणी बुलेट ट्रेन साठीचे रेल्वे स्थानक होणार आहे. त्याबाबतच्या संदर्भात लवकरच जायका यांच्याकडून या वीस दिवसांमध्ये मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात याबद्दलच्या तांत्रिक बोली उघडल्या जातील.

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन : सुमारे दीड ते दोन किलोमीटर चौरस क्षेत्रफळ असलेल्या वांद्रे कुर्ला संकुलाच्या मैदानावर आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्ग दोन अ आणि मेट्रो मार्ग सात यांच्या संदर्भातील बटन दाबून ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे. त्याचा पुनर्विकास करण्यासाठी देखील या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान या ठिकाणाहून करणार आहेत. त्यामुळे या मैदानावर विविध मोठ्या राजकीय सभा किंवा यासारख्या उद्घाटनांचे कार्यक्रम येथे होतात किंवा उद्योग धंदा व्यापार या संदर्भातले प्रदर्शन या मैदानावर होत आहेत.

मग प्रकल्प पूर्णत्वास : राष्ट्रीय गतिशक्ती महामंडळाच्या प्रवक्त्या सुषमा गौर या म्हणाल्या की," कोणत्याही शासकीय एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी विविध स्तरांवर प्रक्रिया राबविल्या जातात. बुलेट ट्रेनच्या संदर्भात प्रत्येक तांत्रिक बोलीच्या आधी जायका म्हणजे जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य एजन्सी यांच्याकडून मान्यता घेतली जाते. या मान्यतेनंतर तांत्रिक बोली लावली जाते त्याचे मूल्यमापन होते. त्यानंतर आर्थिक निविदेच्या संदर्भात प्रक्रिया केली जाते. त्यामुळे प्रकल्पाच्या संदर्भात शासनाचे जसे दिशा निर्देश असतात त्या निर्देशानुसार काम केले जाते. शासनाने ठरवलेल्या अपेक्षित वेळेनुसारच हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल."


स्थानिकांना विश्वासात घेण्याची मागणी :बुलेट ट्रेन प्रकल्पसंदर्भात आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला की , चुकीच्या पद्धतीने बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे नियोजन केले. विकास करतात मात्र स्थानिक जमीन मालक भकास करतात. स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रक्रिया केली तर भूसंपादन होईल. केंद्र सरकार हे उलट्या रीतीने काम करीत आहे. अजूनही महाराष्ट्रामध्ये 100 टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आधीच्या प्रकल्पामुळे लोक देशोधडीला गेले आहे. शासन स्तरावर याबाबत माहिती दिली जात असेल तरी प्रत्यक्षात भूसंपादन जेव्हा होईल त्याच्या नंतरच प्रक्रिया गतिमान होऊ शकतील. कारण गुजरात मध्ये दादरा नागरा हवेली मध्ये तिथे दादागिरी चालते. इकडे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. दादागिरी इकडे चालणार नाही. मात्र महाराष्ट्र मधून याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले त्यामुळे देखील हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची खात्री नाही.कारण जायका मान्यता देईल तरच प्रक्रिया वेगाने पुढे जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details