महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Accident : सुरतहून मुंबईला आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा मृत्यू - मुंबई अपघात

Mumbai Accident : गुरुवारी रात्री वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल प्लाझाजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. या तिघांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Accident
Accident

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 10:57 PM IST

मुंबई Mumbai Accident : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल प्लाझाजवळ भरधाव वेगानं येणाऱ्या एका इनोव्हा कारनं गुरुवारी (९ नोव्हेंबर) अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

चालकावर एफआयआर दाखल : वांद्रे पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी रात्री १०.१५ च्या सुमारास टोलनाक्याच्या १०० मीटर आधी वांद्र्यांच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारनं मर्सिडीजला धडक दिली. अपघातास जबाबदार असलेला इनोव्हा कारचा चालक मोहम्मद सर्फराज शेख याच्याविरुद्ध ३०४ (२) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या तो जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला अद्याप अटक झालेली नाही.

तिघांचा मृत्यू : या घटनेत एक ९१ वर्षीय महिला, तिची मुलगी आणि जावई यांना जीव गमवावा लागला. गुजरातमधील सुरत येथून एका कुटुंबातील सहा सदस्य मुंबईत आले होते. घरी परतत असताना हा अपघात झाला. या प्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३०४ (२), २७९, ३३८, ४२७ आणि मोटार वाहन कायदा १८४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

तीन जखमी रुग्णालयात दाखल : सर्फराज मोहम्मद युसूफ शेख (वय ५०) असं चालकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खतिजा सुलेमान हटिया (वय ९१) या कॅनडातील अनिवासी भारतीय महिला त्यांची मुलगी हवा हिरागोरी हनिफ पीर (वय ५५) आणि जावई हनीफ पीर (वय ६०) यांना भेटण्यासाठी सुरतला गेल्या होत्या. शुक्रवारी सकाळी या दाम्पत्याचा मृत्यू झाला. कारमधील इतर तीन प्रवासी असीन सुलेमान सदर (वय ७१), हाजरा अहमद सदर (वय ४५) आणि मैमुना याकूब सदर (वय ४५) होते. हे सर्वजण भाभा रुग्णालयात दाखल आहेत.

हेही वाचा:

  1. Accident on Bandra Worli Sea Link : वांद्रे वरळी सी लिंकवर सहा वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू, पाहा थरारक व्हिडिओ
  2. Raigad Accident : पुलावरुन सुसाट कार कोसळली धावत्या रेल्वेवर; तीन ठार, दोघे जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details