महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी तरुणांना साद; नवपदवीधरांसाठी एमटीडीसीचा इंटर्नशिप कार्यक्रम - MTDC internship programme

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) इंटर्नशिप (आंतरवासिता) कार्यक्रम सुरू करत आहे. महाराष्ट्रातील नवपदवीधरांसाठी हा कार्यक्रम आहे. याअंतर्गत इंटर्न्सला सोशल मीडिया बिझनेस डेव्हलपमेंट, मनुष्यबळ विकास (एचआर), आयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे

By

Published : Sep 9, 2020, 6:12 PM IST

मुंबई -जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर विस्कटलेल्या पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे आवश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) इंटर्नशिप (आंतरवासिता) कार्यक्रम सुरू करत आहे. महाराष्ट्रातील नव पदवीधरांसाठी हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात इंटर्न्सला सोशल मीडिया बिझनेस डेव्हलपमेंट, मनुष्यबळ विकास (एचआर), आयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल.

एमटीडीसीच्या अखत्यारीत असलेल्या निसर्गरम्य रिसॉर्ट, अ‌ॅडव्हेंचर पार्क, डायव्हींग संस्था, इत्यादींच्या विकासासाठी आपल्या कल्पना मांडता येणार आहेत. याद्वारे तरुणांना विकास प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवता येईल, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात तरुणांना एमटीडीसीच्या महत्त्वाचे प्रकल्प, विभागाचे मंत्री तसेच महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे. इंटर्न्सला दहा हजार रुपये मानधन व एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सहीने अनुभव प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

इंटर्न्सला काम करण्यासाठी कार्यालयात येणे अनिवार्य आहे. सोशल मीडियाचे काम करणाऱ्या उमेदवारांचे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे. या कार्यक्रमाचा कालावधी ६ महिन्यांचा असेल मात्र, जे उमेदवार आपले काम कुशलपणे करतील त्यांना ५ महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जाईल. २५ वर्षापेक्षा खालील वयाचे उमेदवार या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबरच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details