मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 7 ते 9 मे 2022 या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा- 2021 चा अंतिम निकाल आज 15 जून रोजी जाहीर झाला आहे. हा निकाल आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 405 पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. उमेदवारांनी निकाल पाहण्यासाठी आयोगाच्या वेबसाईटवर http://mpsc.gov.in ला भेट द्यावी असे अवाहन करण्यात आले आहे.
या परीक्षेत सर्वसाधारण उमेदवारांमधून चौगुले प्रमोद बाळासाहेब राज्यातून प्रथम आले आहेत. तर महिलांमधून म्हात्रे सोनाली अर्जुनराव यांनी क्रमांक पटकवाला आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांमधून यादव विशाल महादेव हे राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
ज्या उमेदवारांची निकालाच्या आधारे शिफारस केलेली नाही आणि ज्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये गुणपत्रिका उपलब्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत विहित पद्धतीने आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. या संदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटला http://mpsc.gov.in भेट द्यावी.
प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिले : राज्यसेवा 2021 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून सांगलीचे प्रमोद चौघुले सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम आले आहेत. कोल्हापूरच्या शुभम पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. बीडच्या सोनाली म्हात्रे हिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यात त्या राज्यात तीसऱ्या आला आहेत. प्रमोद चौघुले हे सध्या नाशिक येथे उद्योग उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. राज्यात प्रथम आलेल्या प्रमोदचे वडील टेम्पो चालक आहेत, तर आईने शिवणकाम करून संसाराचा रथ चालविला. 2020 मध्ये, प्रमोद चौघुले यांना MPSC मध्ये प्रथम येण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर त्यांची उद्योग विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
कोल्हापूरचे शुभम पाटील द्वितीय :राज्यात दुसरा आलेले शुभम पाटील मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सजनी गावचे आहे. शुभमचे वडील गणपती पाटील हे प्राथमिक शाळेत शिक्षक असून आई गृहिणी आहे. शुभमचे लहानपणापासून सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. शुभमने राज्यसेवा परीक्षा 2020 दिली होती तेव्हा ते पहिल्याच प्रयत्नात राज्यात 22 व्या स्थानी आले होते. अभ्यासाच्या काटेकोर नियोजनामुळे शुभमला हे यश मिळाले. त्यानंतर शुभमने यंदाच्या एमपीएससीमध्ये राज्यात दुसरा येण्याचा मान मिळविला.
बीडची सोनाली मुलींमध्ये राज्यात पहिली : बीड जिल्ह्यातील माजलगावची सोनाली अर्जुन मात्रे ही एमपीएससी परीक्षेत अव्वल आली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरा आणि राज्यात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. सोनालीच्या या यशामुळे तिच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोनालीचे वडील शेतकरी असून एका शेतकऱ्याच्या मुलीने हे यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.