महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छगन भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीत बोलावं, 'खोके' सरकारमध्ये स्पष्टता नाही - सुप्रिया सुळे - मराठा ओबीसी आरक्षण

Supriya Sule : मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत न बोलता बाहेर बोलत आहेत. ही राज्याच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक बाब आहे. या खोके सरकारमध्ये कुठलीही स्पष्टता आणि एक वाक्यता नाही, हे यामुळे समोर येत आहे. या सरकारमध्ये गँगवॉर सुरू असल्याचे संजय राऊत म्हणतात ते योग्यच असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 3:46 PM IST

Updated : Nov 27, 2023, 10:14 PM IST

मुंबई Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळ सध्या चर्चेत आहेत.

भुजबळांनी कॅबिनेटमध्ये बोलावं : छगन भुजबळ वयाने, कर्तुत्व आणि सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठे आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केले. एकामेकांच्या सुखदुःखात सोबत राहिलो आहोत. मला अतिशय प्रांजळपणे, विनम्रपणे भुजबळ यांना एवढीच विनंती करायची की, ज्या काही तुमच्या मागण्या आहेत, आपण आदरणीय आहात, वंदनीय आहात आपण कॅबिनेटमध्ये या राज्याचे प्रतिनिधी आहात. त्यामुळे ज्या मागण्या ते व्यासपीठावर करतात, त्या जर त्यांनी कॅबिनेटमध्ये बंद दाराआड जर केल्या तर बरे होईल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्यातील अस्वस्थता कमी होईल : भाजपाचे 105 आमदार आहेत, ज्यांना मंत्री व्हायची इच्छा आहे. ते बिचारे काही बोलत नाहीत. भाजपाचे बिचारे साल 90 - 95 चे आमदार मंत्रिमंडळात बसत नाहीत, त्यांनी खूप मोठा त्याग केला आहे. महाराष्ट्राच्या या दुर्दैवी गलिच्छ राजकारणामध्ये या सगळ्यांचा गोंधळ चाललेला आहे. यात छगन भुजबळ यांना खूप महत्त्वाचं पद कॅबिनेट मंत्री मिळालेले आहे. त्यामुळे ते मंत्रिमंडळ कॅबिनेटमध्ये जर ते बोलले तर महाराष्ट्रामध्ये जी अस्वस्थता आहे किंवा समज- गैरसमज किंवा जे वातावरण महाराष्ट्रात दूषित होतं, याला पूर्णपणे जबाबदार हे ट्रिपल इंजिनचा खोके सरकार आहे. त्या खोके सरकारने जो गोंधळ आज महाराष्ट्रात घातलेला आहे, 200 आमदार आहेत त्यांच्याकडे, 200 आमदार असताना तुमच्या कॅबिनेट मंत्र्याला जर बाहेरचे व्यासपीठ लागत असेल तर याचा अर्थ काय? की कॅबिनेटमध्ये संजय राऊत जे म्हणतात ते गँगवॉर चालली आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये मिस मॅनेजमेंट आहे. कॅबिनेट मंत्री बाहेर येऊन मागण्या करत असतील तर मग कॅबिनेटमध्ये कसली चर्चा होते? महाराष्ट्राचं नुकसान या ट्रिपल इंजिन खोके स्वार्थी सरकारमुळे होतं, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचे अधिकार मुख्यमंत्र्यांना : महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेत घ्यायचे अधिकार हे सगळे मुख्यमंत्र्यांकडे असतात. तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि डीसीएम वन आणि डीसीएम टू यांना विचारलं पाहिजे की, नक्की तुमच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये निर्णय काय होतात. ते आम्हाल समजलं तर आम्ही पूर्ण ताकतीने त्याच्यावर बोलू. आमचं पहिल्यापासून धोरण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठा, धनगर ,लिंगायत, मुस्लिम समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत, त्याच्यामागे पूर्ण ताकतीने उभा आहे आणि उभा राहील. कुणाचेही सरकार असलं आणि प्रस्ताव आला तर पूर्ण ताकतीने आम्ही त्यांच्याबरोबर राहू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्य सरकारची दुटप्पी भूमिका : महाराष्ट्रात आणि दिल्लीत दोन्ही असेंबली आणि पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही भ्रष्ट जुमला पार्टीसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये नाही म्हणतात. त्यामुळे नक्की या ट्रिपल इंजिन सरकारचा निर्णय काय आहे? त्याच्यात आम्हाला स्पष्टता येत नाहीये, कॅबिनेट मिनिस्टरमध्ये भांडण चालली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आहे, अतिवृष्टी झाली आहे. महागाई, बेरोजगारी याची जबाबदारी घेणार कधी? यांची भांडणं मिटतील तर राज्य पुढे जाईल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. छगन भुजबळांनी जातिवाचक शब्द काढला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा; जरांगेंची मागणी
  2. मराठा समाजाला नव्हे झुंडशाहीला विरोध आहे-छगन भुजबळ
  3. 'भुजबळ, मुंडे यांनी पक्ष काढला असता तर, मी मुख्यमंत्री म्हणून मेळाव्याला आलो असतो'
Last Updated : Nov 27, 2023, 10:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details