मुंबई -एआयएमआयएम पक्षाच्या वतीने शनिवारी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मोठ्या विरोधानंतरही आज चांदीवली येथे सभा रॅली पार पडली. ( MIM Tiranga Rally ) यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. नवी मुंबईजवळ तिरंगा रॅली पोहचल्यावर पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची होती. मी खासदार आहे का दहशतवादी? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. तसेच पोलिसांनी मुंबईला जाण्यासाठी गाड्यांवरील तिरंगा झेंडा काढण्यास सांगितल्याचा आरोप जलील यांनी केला. ( MP Imtiyaz Jaleel in Tiranga Rally Mumbai )
तिरंगा रॅली वाशीजवळ पोहोचल्यानंतर या रॅलीमध्ये आम्ही तिरंगा झेंड्याचा वापर केला होता. आम्ही कोणत्याही पक्षाचा झेंडा लावून आलो नव्हतो.आम्ही हिरवा, निळा, भगवा, पिवळा झेंडा लावला नव्हता. आम्ही या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा गाडीला लावून ही तिरंगा रॅली मुंबईला घेऊन आलो. या तिरंग्यावर आम्हाला अभिमान आहे. तिथे इतका पोलीस फौजफाटा होता की मला शंका आली मी खासदार आहे की कोणी दहशतवादी आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.