मुंबई - निसर्ग चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर,खासदार राहुल शेवाळे यांनी ट्रॉम्बे-कोळीवाडा येथल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या साथीने किनाऱ्या नजीकच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. निसर्ग चक्रीवादळामुळे पालिकेकडून समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना दोन दिवसांसाठी सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
ट्रॉम्बे-कोळीवाडयातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
निसर्ग चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर,खासदार राहुल शेवाळे यांनी ट्रॉम्बे-कोळीवाडा येथल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळ मुंबईत येत आहे. शासनाने एनडीआरफच्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) 20 तुकड्या मुंबई ठाणेसह कोकणातील जिल्ह्यात तैनात केले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकन किनारपट्टीत राहणाऱ्या सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
आठवड्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ धडकल्यानंतर देश नव्या चक्रीवादळाला सामोरे जात आहे. हे निसर्ग नावाचे चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. निसर्ग हे चक्रीवादळाचे नाव भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशने दिलेले आहे.