महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nawab Malik : नवाब मलिक यांच्याशी संबंधित 'या' मालमत्तेवर जप्ती आणण्यासाठी ईडीकडून हालचाली

माजी अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik property issue) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयद्वारे नवाब मलिक आणि कुटुंबातील इतर व्यक्तींच्या संबंधित मालमत्ता जप्त करण्याकरिता (Nawab Malik property seized by ED) ईडीच्या हालचाली सुरू आहे. नबाब मलिक यांच्या यापूर्वी 15 कोटी 15 लाख एवढी मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली होती.

ED Action On Nawab Malik
नवाब मलिक

By

Published : Nov 5, 2022, 6:10 PM IST

मुंबई :माजी अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik property issue) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयद्वारे नवाब मलिक आणि कुटुंबातील इतर व्यक्तींच्या संबंधित मालमत्ता जप्त करण्याकरिता (Nawab Malik property seized by ED) ईडीच्या हालचाली सुरू आहे. नबाब मलिक यांच्या यापूर्वी 15 कोटी 15 लाख एवढी मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली होती. आता ईडीकडून ही मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडीच्या कायदेशीर विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे लवकरच ईडी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये या संदर्भात परिसर अर्ज दाखल करणार आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime

नवाब मलिक यांच्या 7 मालमत्ता जप्त -नवाब मलिक यांची 15.15 कोटी रुपयांच्या 7 मालमत्ता ईडीने तात्पुरत्या जप्त केल्या होत्या. ईडीने चालू वर्षात 13 एप्रिल रोजी मालमत्ता जप्त केली होती. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे सत्र न्यायालयाच्या परवानगीनुसार नवाब मलिक यांच्यावर खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे नवाब मलिक यांना किडनीचा आजारावर उपचार सुरू आहे. यापूर्वी या वर्षी 13 एप्रिल रोजीच्या आपल्या आदेशात ईडीने म्हटले होते की प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा, 2002 च्या कलम 5 च्या उपकलम (1) अंतर्गत मालमत्ता तात्पुरत्या जोडल्या गेल्या आहेत कलम 5 मधील दुसऱ्या तरतुदीसह वाचा. 1) आदेशाच्या तारखेपासून 180 दिवसांच्या कालावधीसाठी कायदा आहे.



ईडी कडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता पुढील प्रमाणे :
1) गोवाला कंपाऊंड, कुर्ला पश्चिम 3.53 कोटी रुपयांचे मालक मेसर्स सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड
2) व्यावसायिक युनिट क्रमांक F-54, कोहिनूर सिटी मॉल, कुर्ला पश्चिम, 58.27 लाख रुपये फराज नवाब मलिक आणि आमिर नवाब मलिक
3) अपार्टमेंट क्रमांक 1902, 19 वा मजला वांद्रे पश्चिम एकूण किंमत 9.84 कोटी, 2.84 कोटी संलग्न फराज नवाब मलिक यांनी रु. 2.84 कोटी भरले आहे.
4) उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतजमीन 2.7 कोटी फराज नवाब मलिक नूर मनाली कुर्ला पश्चिम येथे फ्लॅट 1.86 कोटी
5) फ्लॅट क्रमांक 501 वांद्रे 2.5 कोटी फराज नवाब मलिक आणि फ्लॅट क्रमांक 2बेनमार को-ऑप हाऊसिंग सोसायटी वांद्रे पश्चिम 1.76 कोटी


नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप?
नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details