महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. सकाळी ९ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर..

पुण्यात साड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली असून त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगरमध्ये तरुणावरील अॅसिड हल्ला प्रकरणाचे गूढ उलगडले असून प्रेमप्रकरणातून राग धरलेल्या प्रियसीनेच हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. आयएनएस विराट युध्दनौकेचा वापर राजीव गांधींनी फिरण्यासाठी केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. पिपंरी-चिंचवडमध्ये चोरीची घटना १५ लाखांवर चोरांनी केला हात साफ.. तर ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत १० मे रोजी आयुक्तालयात सुनावणी होणार असल्याने आयुक्तांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे

By

Published : May 9, 2019, 9:00 AM IST

पुण्यातील साडी सेंटरमध्ये अग्नीतांडव, ५ जणांचा होरपळून मृत्यू

पुणे - देवाची उरळी येथील राजयोग साडी सेंटरला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या, तर १० खासगी टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सविस्तर वृत्त

प्रेमात दगा-फटका : अहमदनगरच्या 'त्या' हल्ल्याचे गूढ उकलले, प्रेयसीनेच प्रियकरावर केला अॅसिड हल्ला

अहमदनगर - शहरातील एका हॉटेलमध्ये 6 मे रोजी तरुणावर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणाचे गूढ उलगडले असून प्रेमप्रकरणातून राग धरलेल्या प्रियसीनेच हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टीच्या अमीर रशीद शेख याच्यावर आरोपी प्रेयसी अंजुम अजमेर शेख हिने हा हल्ला केला असल्याचे तोफखाना पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

सविस्तर वृत्त

आयएनएस विराट युध्दनौकेचा वापर राजीव गांधींनी फिरण्यासाठी केला - मोदी

नवी दिल्ली - राजीव गांधी हे पंतप्रधान असताना आयएनएस विराट युध्दनौका ही आपल्या नातेवाईकांसोबत सुट्टी घालवण्यासाठी वापरायचे. गांधी कुटुंबियांनी आपल्या खासगी वापरासाठी आयएनएस विराट युध्दनौकेचा वापर केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. बुधवारी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजीत प्रचार सभेत त्यांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला.

सविस्तर वृत्त

पिंपरी-चिंचवडमध्ये तलवारी नाचवत घरफोडी, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

पुणे - पिपंरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी तलवारी नाचवत एका सोसायटीमध्ये घरफोड्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये सुमारे १५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सविस्तर वृत्त

रत्नागिरी : शिक्षकांच्या बदल्यांवर 10 मे रोजी आयुक्तालयात सुनावणी; आयुक्तांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

रत्नागिरी - ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांमधील हजारो शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या. या प्रक्रियेत अन्याय झाल्याची तक्रार कोकण आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील 322 शिक्षकांच्या कार्यमुक्ती आदेशाला आयुक्तांनी स्थगिती दिली होती. परंतु, आदेश येण्यापूर्वी शिक्षक कार्यमुक्त झाल्याने त्यांना नवीन शाळेत रुजू होणे भाग पडले. त्या शिक्षकांच्या याचिकेवर 10 मे रोजी सुनावणी होणार असून आयुक्त काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वृत्त

ABOUT THE AUTHOR

...view details