समाज माध्यामावर सुप्रिया सुळेंसंदर्भात आक्षेपार्ह कमेंट, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला बदडले
मुंबई - कोल्हापुरातील एका तरुणाने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला घरी जाऊन बदडल्याची घटना घडली आहे. वाचा सविस्तर...
ऑनर किलिंगने चंद्रपूर हादरले.. मुलीच्या वडील आणि भावाने केली प्रियकराची हत्या
चंद्रपुर - जिल्ह्यातील घुग्घुस येथे एका प्रेमप्रकरणात ऑनर किलिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रियकराची वडील आणि भावाने हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही हत्या सुनियोजितरित्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वाचा सविस्तर...
जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र; टँकरची संख्या दोनशेवर जाण्याची शक्यता
जळगाव - जिल्ह्यात दुष्काळाचे सावट अधिक तीव्र होत आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या सद्यस्थितीत 184 एवढी आहे. या गावांना दीडशेहून अधिक टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या आठवडाभरात टँकरची संख्या 200 पार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. वाचा सविस्तर...
आज...आत्ता... सकाळी ९ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर... - g s laxmi
समाज माध्यामावर सुप्रिया सुळेंसंदर्भात आक्षेपार्ह कमेंट, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला बदडले. ऑनर किलिंगने चंद्रपूर हादरले.. मुलीच्या वडील आणि भावाने केली प्रियकराची हत्या. जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र; टँकरची संख्या दोनशेवर जाण्याची शक्यता. मोदीजी, एकवेळ मरण पत्करेन, पण तुमच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही - राहुल गांधी. भारताच्या जी. एस. लक्ष्मी बनल्या आयसीसीच्या पहिल्या महिला मॅच रेफरी.
मोदीजी, एकवेळ मरण पत्करेन, पण तुमच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही - राहुल गांधी
उज्जैन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते सध्या विविध ठिकाणी सभांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसह गांधी कुटुंबीयांवर हल्ले चढवत आहेत. एकाच परिवाराचे राजकारण आणि राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार याला विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी 'मोदीजी, मी एकवेळ मरण पत्करेन पण, तुमच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही,' असा टोला लगावला आहे. ते मध्य प्रदेशात एका सभेत बोलत होते. वाचा सविस्तर...
भारताच्या जी. एस. लक्ष्मी बनल्या आयसीसीच्या पहिल्या महिला मॅच रेफरी
दुबई - भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांची आयसीसीच्या पहिल्या महिला मॅच रेफरी म्हणून निवड करण्यात आली आहे. ५१ वर्षीय लक्ष्मी या स्थानिक महिला क्रिकेटमध्ये २००८-०९ साली मॅच रेफरी पदावर राहिल्या आहेत. याचसोबत त्यांनी तीन टी-२० आणि एकदिवसीय सामन्यात मॅच रेफरी म्हणून काम पहिले आहे. लक्ष्मी यांच्या पूर्वी याच महिन्यात क्लेयर पोलोसक यांनी पुरूषाच्या क्रिकेट स्पर्धेत पंच म्हणून भूमिका बजावली होती. वाचा सविस्तर...