महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...शनिवार सकाळी 9 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - आज...आत्ता...

पाकिस्तान संघाचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तर कल्याणमध्ये दिवसाढवळ्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे, या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मनात पक्षाविषयी असलेली खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. त्याबरोबरच बजेटमध्ये पेट्रोल-डिझेल यावरील अधिभार वाढवल्याने इंधन महागणार आहे. यामुळे वाहनचालक नाराज आहेत. तसेच अर्थसंकल्प केवळ दिवास्वप्न दाखवणारा आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

आज...आत्ता...शनिवारी सकाळी 9 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

By

Published : Jul 6, 2019, 9:09 AM IST

पेट्रोलच्या दराचा भडका, बजेटनंतर दुसऱ्याच दिवशी असे आहेत पेट्रोलचे दर

नवी दिल्ली - इंधनाचे दर सातत्याने वाढतच आहेत. अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनीवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 2.४५ पैशांनी तर डिझेल 2.३६ पैशांनी महागले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर

शोएब मलिकची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

लंडन - आयसीसी विश्वकप 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशावर 94 धावांनी विजय मिळविला. या विजयानंतर पाकिस्तान संघाचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर

कल्याणमध्ये दिवसाढवळ्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या; हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

ठाणे - कल्याण पश्चिम परिसरातील एपीएमसी मार्केटमध्ये सायंकाळच्या सुमाराला एका तरूणीवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सनम करोतीया (वय -२७ रा. उल्हासनगर ) असे मृत तरूणीचे नाव आहे. दरम्यान, या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वाचा सविस्तर

नाथाभाऊ पुन्हा बरसले; म्हणाले पक्ष तिकीट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मनात पक्षाविषयी असलेली खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. त्यांच्यावरील आरोपांबाबत चौकशी होऊनही पक्षाने स्पष्टीकरण न दिल्याने ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. 'माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत मी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत काही मुद्दे मांडले. पण त्यावर सरकारकडे काहीही उत्तर नाही. माझ्या मुद्यांवर सरकारने स्पष्टीकरणाचा चकार शब्दही काढला नाही. आता पक्ष तिकीट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी आहे', असे सांगत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. वाचा सविस्तर

केंद्रीय अर्थसंकल्प दिवास्वप्न दाखवणारा - पृथ्वीराज चव्हाण

मुंबई - यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये रोजगारवाढासाठीही काहीही तरतुद केलेली नाही. तसेच आरोग्यांबाबत काहीही उल्लेख नाही. हा अर्थसंकल्प केवळ दिवास्वप्न दाखवणारा आहे. त्यामुळे भाजपला बहुमत मिळूनही त्यांचा अर्थसंकल्प निराशाजनक ठरला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details