आषाढी वारी: संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना 'नीरा स्नान', सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
सोलापूर - संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना आज इंदापूर तालुक्यातील सराटी इथे निरा स्थान घालण्यात आले. पालखी सोहळ्यात निरास्नानाला अनन्य साधारण महत्व आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या गरजरात हा सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी नीरा नदीकाठी मोठी गर्दी केली होती. वाचा सविस्तर
तिवरे धरण दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी विशेष पथकाची स्थापना
रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील (जि. रत्नागिरी) तिवरे धरण फुटल्यामुळे २३ जण बेपत्ता झाले होते. तर इतरही मोठी हानी झाली होती. या सर्व जिवित व वित्त हानीची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी जलसंधारण विभागाने विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. मृद व जलसंधारण विभागाने या संबंधी काढलेल्या शासन निर्णयानुसार, दोन महिन्यात या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकास देण्यात आले आहेत. वाचा सविस्तर
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईत दाखल
मुंबई - कर्नाटकात सध्या राजकीय वादळ आले आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण ११ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, स्वतः राजीनामा देणारे एच. विश्वानाथ यांनी १४ आमदारांनी राजीनामे दिल्याचा दावा केला आहे. या बंडखोर आमदारांपैकी १० आमदार आज रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी सोफिटेल हॉटेलमध्ये १४ रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ते त्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. वाचा सविस्तर
"सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री बनायचेय, कर्नाटकातील राजकीय घडामोडींमागे त्यांचाच हात"
हुबळी - 'काँग्रेसचे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे त्यांची सध्याचे आघाडी सरकार चालू देण्याची इच्छा नाही. आम्ही केवळ परिस्थितीचे निरीक्षण करत आहोत. जेव्हा सरकार आपोआप पडेल, तेव्हा आम्ही काहीही करू शकतो,' असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे.वाचा सविस्तर
CRICKET WC : सेमीफायनलची गणितं सुटली, भारत न्यूझीलंडशी तर ऑस्ट्रेलिया इंग्लंडशी भिडणार
लंडन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. काल झालेल्या भारत-श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया- आफ्रिका सामन्याने सेमीफायनलची गणितं सुटली आहेत. वाचा सविस्तर