महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CoronaVirus : राज्यात २ हजार २५९ नवे पॉझिटिव्ह; १ हजार ६६३ जण कोरोनामुक्त, १२० रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन ते अनलॉक प्रवासात आज राज्यातील १ हजार ६६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ६३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २ हजार २५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

more-than-two-thousand-corona-cases-found-on-tuesday
राज्यात २ हजार २५९ नवीन रुग्णांची नोंद

By

Published : Jun 9, 2020, 10:20 PM IST

मुंबई- कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन ते अनलॉक प्रवासात आज राज्यातील १ हजार ६६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ६३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २ हजार २५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ४४ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ७७ हजार ८११ नमुन्यांपैकी ९० हजार ७८७ नमुने पॉझिटिव्ह (१५.७१ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६८ हजार ०७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ९३० खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ४७० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:

ठाणे- ८३ (मुंबई ५८, ठाणे १३, मीरा-भाईंदर ६, पनवेल ३, नवी मुंबई १, वसई-विरार २), नाशिक- ३ (नाशिक ३), पुणे- १८ (पुणे १६, सोलापूर २), कोल्हापूर- १ (रत्नागिरी १),औरंगाबाद-१० (औरंगाबाद १०), अकोला -३ (अकोला २, अमरावती १), नागपूर-१ (नागपूर १), इतर राज्य-१ (मध्ये प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू नागपूरमध्ये झाला आहे.) आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८० पुरुष तर ४० महिला आहेत. १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६२ रुग्ण आहेत तर ४७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहेत. या १२० रुग्णांपैकी ९१ जणांमध्ये ( ७५.८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२८९ झाली आहे.


*राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील -

  • *मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (५१,१००), बरे झालेले रुग्ण- (२२,९४३), मृत्यू- (१७६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६,३९१)
  • *ठाणे: बाधीत रुग्ण- (१४,०६३), बरे झालेले रुग्ण- (५२१८), मृत्यू- (३५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४८९)
  • *पालघर: बाधीत रुग्ण- (१६३६), बरे झालेले रुग्ण- (६०८), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८५)
  • *रायगड: बाधीत रुग्ण- (१५००), बरे झालेले रुग्ण- (९२६), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१४)
  • *नाशिक: बाधीत रुग्ण- (१६६०), बरे झालेले रुग्ण- (१०९४), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७१)
  • *अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८०)
  • *धुळे: बाधीत रुग्ण- (२९०), बरे झालेले रुग्ण- (१२९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३५)
  • *जळगाव: बाधीत रुग्ण- (११४९), बरे झालेले रुग्ण- (५१६), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१८)
  • *नंदूरबार: बाधीत रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८)
  • *पुणे: बाधीत रुग्ण- (१०,०७३), बरे झालेले रुग्ण- (५९०३), मृत्यू- (४२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७४२)
  • *सोलापूर: बाधीत रुग्ण- (१४६८), बरे झालेले रुग्ण- (६२७), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२९)
  • *सातारा: बाधीत रुग्ण- (६५८), बरे झालेले रुग्ण- (३५९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७२)
  • *कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (६७०), बरे झालेले रुग्ण- (४३०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३२)
  • *सांगली: बाधीत रुग्ण- (१८०), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८१)
  • *सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (३१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९९)
  • *रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३७८), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७७)
  • *औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२०८५), बरे झालेले रुग्ण- (१२७१), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०४)
  • *जालना: बाधीत रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१३१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७३)
  • *हिंगोली: बाधीत रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१६८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६)
  • *परभणी: बाधीत रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५)
  • *लातूर: बाधीत रुग्ण- (१३९), बरे झालेले रुग्ण- (११२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
  • *उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)
  • *बीड: बाधीत रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१६)
  • *नांदेड: बाधीत रुग्ण- (१७१), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०)
  • *अकोला: बाधीत रुग्ण- (८४८), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६२)
  • *अमरावती: बाधीत रुग्ण- (३०३), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४)
  • *यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (११६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६)
  • *बुलढाणा: बाधीत रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)
  • *वाशिम: बाधीत रुग्ण- (१२), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४)
  • *नागपूर: बाधीत रुग्ण- (७८८), बरे झालेले रुग्ण- (४७८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९८)
  • *वर्धा: बाधीत रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)
  • *भंडारा: बाधीत रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)
  • *गोंदिया: बाधीत रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१)
  • *चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६)
  • *गडचिरोली: बाधीत रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (३४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११)
  • *इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८)
  • *एकूण: बाधीत रुग्ण-(९०,७८७), बरे झालेले रुग्ण- (४२,६३८), मृत्यू- (३२८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(११),ॲक्टीव्ह रुग्ण-(४४,८४९)

    राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३७५० कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ९९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी ६९.१६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details