महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत 27 हजार 189 लाभार्थ्यांचे लसीकरण

By

Published : Apr 18, 2021, 9:56 PM IST

आज (दि. 18 एप्रिल) मुंबईत 27 हजार 189 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 19 लाख 69 हजार 67 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईत संचारबंदी असताना काल (दि. 17 एप्रिल) 50 हजाराहून अधिक तर आज 27 हजाराहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई- मुंबईत 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज (दि. 18 एप्रिल) मुंबईत 27 हजार 189 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 19 लाख 69 हजार 67 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईत संचारबंदी असताना काल (दि. 17 एप्रिल) 50 हजाराहून अधिक तर आज 27 हजाराहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे.

लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत आज (दि. 18 एप्रिल) 27 हजार 189 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 20 हजार 844 लाभार्थ्यांना पहिला तर 6 हजार 345 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 19 लाख 69 हजार 67 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 17 लाख 18 हजार 87 लाभार्थ्यांना पहिला तर 2 लाख 50 हजार 980 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 66 हजार 131 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 97 हजार 232 फ्रंटलाईन वर्कर, 7 लाख 56 हजार 891 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 6 लाख 48 हजार 813 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

असे झाले लसीकरण

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 18 हजार 374 तर आतापर्यंत 12 लाख 67 हजार 930 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 3 हजार 70 लाभार्थ्यांना तर एकूण 1 लाख 42 हजार 492 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 5 हजार 745 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 5 लाख 58 हजार 645 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

एकूण लसीकरण

आरोग्य कर्मचारी- 2 लाख 66 हजार 131

फ्रंटलाईन वर्कर - 2 लाख 97 हजार 232

ज्येष्ठ नागरिक - 7 लाख 56 हजार 891

45 ते 59 वय- 6 लाख 48 हजार 813

एकूण- 19 लाख 69 हजार 67

हेही वाचा -फडवणीस, दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा का? याची माहिती घेतोय - गृहमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details