महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात ३ हजार ६४३ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, १०५ मृत्यू

राज्यात राज्यात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) रोजी रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत घट दिसून आली. ३ हजार ६४३ नव्या रुग्णांची तर १०५ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातून आज ६ हाजार ७९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

न

By

Published : Aug 23, 2021, 9:03 PM IST

मुंबई - राज्यात राज्यात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) रोजी रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत घट दिसून आली. ३ हजार ६४३ नव्या रुग्णांची तर १०५ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातून आज ६ हाजार ७९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ४९ हजार ९२४ सक्रिय रुग्ण

राज्यात ६ हजार ७९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ३८ हजार ७९४ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३ हजार ६४३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १०५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३६ हजार ६७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २४ लाख ५४ हजार ६८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख २८ हजार २९४ (१२.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २ हजार ८८८ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ४९ हजार ९२४ सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.११ टक्के

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६, १८ ऑगस्टला १५८, १९ ऑगस्टला १५४, २० ऑगस्टला १०५, २१ ऑगस्टला १४५, २३ ऑगस्टला १०५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.११ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई - २२५

रायगड - ४६

पनवेल पालिका - ६०

अहमदनगर - ५४२

पुणे - ४२१

पुणे पालिका - १२३

पिपरी चिंचवड पालिका - १०६

सोलापूर - ५१४

सातारा - ४५७

कोल्हापूर - १७८

सांगली - ३७२

सांगली, मिरज, कुपवाडा पालिका - ६३

सिंधुदुर्ग - ४७

रत्नागिरी - ६३

उस्मानाबाद - ४६

बीड - ५५

हेही वाचा -अकरावी प्रवेशासाठी २ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज; आजची शेवटची तारीख!

ABOUT THE AUTHOR

...view details