मुंबई- आज मंगळवारी (दि. ८ डिसें.) राज्यात ४ हजार २६ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख ५९ हजार ३६७ वर पोहोचला आहे. राज्यात आज (दि. ८ डिसें.) ५३ करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७ हजार ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ७३ हजार ३७४ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
१ कोटी १३ लाख ७७ हजार ७४ जणांची झाली तपासणी
राज्यात मंगळवारी (दि. ८ डिसें.) ६ हजार ३६५ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १७ लाख ३७ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात मंगळवारी ५३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १३ लाख ७७ हजार ७४ नमुन्यांपैकी १८ लाख ५९ हजार ३६७ नमुने म्हणजेच १६.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४८ हजार ९६१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ५ हजार ६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कधी किती रुग्ण आढळून आले