मुंबई- लडाखच्या गलवान खोऱ्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर भारत-चीन दरम्यान चर्चेतून मार्ग काढला जात असताना आता चीनमधून भारतातील सरकारी आस्थापने, बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर व संपर्क क्षेत्रात सायबर हल्ले मागील 4 दिवसात वाढल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आलेल्या या सायबर हल्ल्याच्या तपासामधून ही माहिती समोर आली आहे. या सायबर हल्ल्यात अनोळखी मेलच्या माध्यमातून हे हल्ले केले जात आहेत. या काळात इंटरनेटवर जर तुम्ही तुमची व्यक्तिगत माहिती कुणासोबत शेअर करत असाल तर तुम्ही अधिक सतर्क राहायला हवे, असे असल्याचे महाराष्ट्र सायबर सेलकडून नागरिकांना सूचित करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 4 दिवसात चीनमधील चेंगदू या शहरातून तब्बल 40 हजार 300 सायबर हल्ल्यांचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना चीनमधील चेंगदू येथून सायबर हल्ले वाढले आहेत. कोरोनाच्या संदर्भात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू सारख्या इतर महत्वाच्या शहरात मोफत कोरोनाचाचणीसाठी स्वतःची माहिती भरण्यासाठी ncov2019@gov.in सारख्या बनावट लिंक वर क्लिक करून माहिती देण्यास सायबर हॅकर नागरिकांना सांगत असल्याचे तपासातून समोर आले आहे.
कसे राहाल सतर्क