मुंबई - निसर्ग वादळाच्या संकटातून बचावलेल्या महाराष्ट्रात आज १ हजार ३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २ हजार ९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७३ हजार ४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १२३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे : ठाणे - ६८ (मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई ६, वसई विरार १, पालघर १, पनवेल १), नाशिक - २५ (धुळे १, जळगाव २१, नाशिक ३), पुणे - १६ (पुणे ९, सोलापूर ७), कोल्हापूर - २ (कोल्हापूर २) औरंगाबाद - ८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर - ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), अकोला - ३ (वाशिम २, यवतमाळ १).
आज नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये ८५ पुरुष तर ३८ महिलांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७१ रुग्ण आहेत. तर, ४४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर, ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२३ रुग्णांपैकी ९२ जणांमध्ये ( ७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २ हजार ७१० झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर, उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते १ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९३ मृत्यूंपैकी मुंबई ४०, जळगाव - १६, ठाणे ८, सोलापूर - ६, नवी मुंबई - ५, रायगड -३, परभणी २, नाशिक २, वाशिम -२ , औरंगाबाद - २,पनवेल १, पालघर -१ , वसई विरार - १ उस्मानाबाद -१, धुळे -१, नांदेड १ आणि यवतमाळ - १ असे मृत्यू आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील -
*मुंबई महानगरपालिका:* बाधित रुग्ण - (४४,९३१), बरे झालेले रुग्ण- (१८,०९६), मृत्यू - (१४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (६), ॲक्टिव्ह रुग्ण - (२५,३६४)
*ठाणे:* बाधित रुग्ण - (११,४२०), बरे झालेले रुग्ण - (४१७९), मृत्यू - (२५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (६९८७)
*पालघर:* बाधित रुग्ण - (१२३४), बरे झालेले रुग्ण - (४५८), मृत्यू - (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (७४०)
*रायगड:* बाधित रुग्ण - (१२९३), बरे झालेले रुग्ण - (७०४), मृत्यू - (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (२), ॲक्टिव्ह रुग्ण - (५३२)
*नाशिक:* बाधित रुग्ण - (१२९७), बरे झालेले रुग्ण - (९४२), मृत्यू - (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२८४)
*अहमदनगर:* बाधित रुग्ण - (१७०), बरे झालेले रुग्ण - (७२), मृत्यू - (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (९०)
*धुळे:* बाधित रुग्ण - (१८७), बरे झालेले रुग्ण - (९९), मृत्यू - (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (६७)
*जळगाव:* बाधित रुग्ण - (८५२), बरे झालेले रुग्ण - (३६२), मृत्यू - (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (३९५)
*नंदूरबार:* बाधित रुग्ण - (३९), बरे झालेले रुग्ण - (२८), मृत्यू - (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (७)
*पुणे:* बाधित रुग्ण - (८८२५), बरे झालेले रुग्ण - (४७७४), मृत्यू - (३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (३६७५)
*सोलापूर:* बाधित रुग्ण - (११२५), बरे झालेले रुग्ण - (४५७), मृत्यू - (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (५७६)
*सातारा:* बाधित रुग्ण - (५८४), बरे झालेले रुग्ण - (२१२), मृत्यू - (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (३५०)
*कोल्हापूर:* बाधित रुग्ण - (६१२), बरे झालेले रुग्ण - (२६०), मृत्यू - (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (३४६)
*सांगली:* बाधित रुग्ण - (१२७), बरे झालेले रुग्ण - (७१), मृत्यू - (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (५२)
*सिंधुदुर्ग:* बाधित रुग्ण - (८७), बरे झालेले रुग्ण - (१७), मृत्यू - (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (७०)
*रत्नागिरी:* बाधित रुग्ण - (३२९), बरे झालेले रुग्ण - (१२३), मृत्यू - (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२०१)