महाराष्ट्र

maharashtra

राज्यात ५ हजार ५०८ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, १५१ रुग्णांचा मृत्यू

By

Published : Aug 8, 2021, 10:32 PM IST

राज्यात रविवारी (दि. ८ ऑगस्ट) राज्यात ५ हजार ५०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

c
c

मुंबई- राज्यात रविवारी (दि. ८ ऑगस्ट) राज्यात ५ हजार ५०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३३ हजार ९९६ मृत्यूंची नोंद झाली असून ६३ लाख ५३ हजार ३२८ जण आतापर्यंत बाधित झाले आहेत.

४ हजार ८९५ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात रविवारी (दि.८ ऑगस्ट) ४ हजार ८९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ४४ हजार ३८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ९५ लाख ६८ हजार ५१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ५३ हजार ३२८ (१२.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख २२ हजार ९९६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७१ हजार ५१० सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.१ टक्के

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई - ३०५

रायगड - १०३

नाशिक - ५८

अहमदनगर - ७४५

पुणे - ५४२

पुणे पालिका - २१३

पिपरी चिंचवड पालिका - २०८

सोलापूर - ५९७

सातारा - ६१४

कोल्हापूर - ३८५

कोल्हापूर पालिका - ८९

सांगली - ४७३

सांगली मिरज कुपवाडा पालिका - १००

सिंधुदुर्ग - ११७

रत्नागिरी - १०३

बीड - २१७

हेही वाचा -मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी, 15 ऑगस्टपासून लसवंतांसाठी लोकल सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details