महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 26, 2021, 10:26 PM IST

ETV Bharat / state

राज्यात आज 58 हजार 809 तर आतापर्यंत 12 लाख 1 हजार 96 लाभार्थ्यांचे लसीकरण

राज्यात आज 58 हजार 809 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 12 लाख 1 हजार 96 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड आणि को-वॅक्सिन ही लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

corona vaccine
मुंबई कोरोना

मुंबई- कोरोना विषाणूची लागण होऊ नये, विषाणूपासून संरक्षण व्हावे म्हणून 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. त्याअनुषंगाने राज्यात आज 58 हजार 809 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 12 लाख 1 हजार 96 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड आणि को-वॅक्सिन ही लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

लसीकरणाची आकडेवारी -

राज्यात आज 826 केंद्रांवर 58 हजार 809 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 31,376 लाभार्थ्यांना पहिला तर 27,433 लाभार्थ्यांना दुसरा लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 8 हजार 101 आरोग्य आणि 23 हजार 275 फ्रंट लाईन वर्कर लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 27 हजार 433 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 57 हजार 450 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड लसीद्वारे लसीकरण करण्यात आले. 1359 लाभार्थ्यांना को-वॅक्सिन ही लस देण्यात आली. आजपर्यंत 12 लाख 1 हजार 96 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

जिल्हानिहाय आकडेवारी -

अहमदनगर 40144
अकोला 14045
अमरावती 25747
औरंगाबाद 29732
बीड 23179
भंडारा 14107
बुलढाणा 19193
चंद्रपूर 24192
धुळे 15085
गडचिरोली 15134
गोंदिया 15367
हिंगोली 8237
जळगांव 26930
जालना 16992
कोल्हापूर 37584
लातूर 21485
मुंबई 215603
नागपूर 56390
नांदेड 17326
नंदुरबार 17399
नाशिक 54060
उस्मानाबाद 13052
पालघर 29932
परभणी 9679
पुणे 123477
रायगड 18755
रत्नागिरी 18087
सांगली 28528
सातारा 45612
सिंधुदुर्ग 10547
सोलापूर 37011
ठाणे 108196
वर्धा 21676
वाशीम 8647
यवतमाळ 19966

एकूण 12,01,096

ABOUT THE AUTHOR

...view details