महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साडेचौदा हजार नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, बाधितांचा एकूण आकडा 14 लाख पार - महाराष्ट्र कोरोना आकडेवारी बातमी

राज्यात आज 14 हजार 578 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकुण बाधितांचा आकडा 14 लाख 80 हजार 489 वर पोहोचला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 7, 2020, 9:55 PM IST

मुंबई - राज्यात आज 14 हजार 578 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 355 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 16 हजार 715 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2 लाख 44 हजार 527 सक्रिय रुग्णांवर राज्याच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत 11 लाख 96 हजार 441 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.81 टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या 2 लाख 44, 527 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 73 लाख 24 हजार 188 नमुन्यांपैकी 14 लाख 80 हजार 489 नमुने पॉझिटिव्ह म्हणजेच 20.21 टक्के आले आहेत. राज्यात 22 लाख 48 741 लोक गृहविलगिकरणात आहेत. सध्या 25 हजार 655 लोक संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज 355 कोरोना बाधितांच्या मृत्यूची झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले

आज नोंद झालेल्या एकूण 355 मृत्यूंपैकी 211 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 48 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 96 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. पुणे – 20, नागपूर - 14, सातारा - 12, कोल्हापूर - 7, परभणी - 6, बीड - 5, नांदेड - 5, वर्धा - 5, अहमदनगर - 4, सोलापूर - 3, नाशिक - 3, जालना - 2, ठाणे - 2, औरंगाबाद - 1, भंडारा - 1, चंद्रपूर - 1, मुंबई - 1, उस्मानाबाद - 1, यवतमाळ - 1, वाशीम - 1 आणि सांगली - 1 असे हे मृत्यू आहेत.

हेही वाचा -भाजप प्रदेश कार्यसमितीची गुरुवारी पहिली बैठक, राज्यातील विविध विषयांवर होणार चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details