मुंबई- राज्यात आज (दि. 10 एप्रिल) 55 हजार 411 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 309 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33 लाख 43 हजार 951 झाली आहे. आतापर्यंत 57 हजार 638 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
27 लाख 48 हजार 153 कोरोनामुक्त
राज्यात मागील 24 तासांत (दि. 10 एप्रिल) 53 हजार 3 रुग्णांची कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 27 लाख 48 हजार 153 जण कोरोनामुक्त कोरोनामुक्त झाले आहेत.
5 लाख 36 हजार 682 सक्रिय
सध्या राज्यात 5 लाख 36 हजार 682 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
उद्या ठरणार टाळेबंदीची रुपरेषा
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक गाठला आहे. दोनदा कोरोनाची लस घेणाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज (दि. 10 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत एकमत झाले आहे. उद्या (दि. 11 एप्रिल) टास्कफोर्सची बैठक बोलाविण्यात आली असून त्या बैठकीतच लॉकडाऊन लावायचा व किती दिवसांचा लावायचा याचा निर्णय होणार आहे. याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा -मुंबईत २० दिवसात १ लाख ३८ हजार जणांना कोरोना, तर ९८ हजार डिस्चार्ज
हेही वाचा -केंद्र राज्याला देणार 1 हजार 121 'व्हेंटिलेटर' - केंद्रीय मंत्री जावडेकर