मुंबई -पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात येत्या 9 फेब्रुवारीला मनसेचा मुंबईत मोर्चा होणार आहे. या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने वर्सोवा परिसरात बांगलादेशी घुसखोरांविरोधात बॅनर लावले आहेत. मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी वर्सोवा राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना मनसे स्टाईल इशारा दिला आहे.
'बांगलादेशी घुसखोरांनो तुमच्या देशात निघून जा', मनसे इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात येत्या 9 फेब्रुवारीला मोर्चाचा काढण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे. वर्सोव्यात पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना बॅनरबाजी करत इशारा दिला आहे.
हेही वाचा -विकासाचा रोडमॅप तयार; केंद्र सरकार आर्थिक कोंडी करत असल्याचाही मुख्यमंत्र्यांचा आरोप
या बॅनरच्या माध्यमातून मनसेने 'बांगलादेशी घुसखोरांनो तुम्ही तुमच्या देशात निघून जा' असा इशारा दिला आहे. मनसेच्या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्च्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर मनसेचे पदाधिकारी मोर्च्याच्या तयारीला लागले आहे. मुंबईतील प्रत्येक विभाग अध्यक्षावर या मोर्चाची जबाबदारी दिली आहे. तत्पूर्वी सोमवारी पनवेलमध्ये मसनेने असे बॅनर लावले आहेत.