महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसेच्या महाअधिवेशनाचे पोस्टर लाँच... 'या' तारखेला धडाडणार राज ठाकरेंची तोफ - mns mahaadhiveshan mumbai latest news

या पोस्टरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिमा आणि सोबत भगवा महाराष्ट्र राज्य असलेले चित्र आहे. 'विचार महाराष्ट्र धर्माचा ! निर्धार हिंदवी स्वराज्याचा' हे या महाअधिवेशनाचे घोषवाक्य आहे.

mns mahaadhiveshan poster launch in mumai
मनसेचे अधिवेशनाच पोस्टर लाँच

By

Published : Jan 17, 2020, 8:39 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन येत्या 23 जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे पोस्टर लाँच करण्यात आले. हे महाअधिवेशन गोरेगावातील नेस्को सेंटर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे.

या पोस्टरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिमा आणि सोबत भगवा महाराष्ट्र राज्य असलेले चित्र आहे. 'विचार महाराष्ट्र धर्माचा ! निर्धार हिंदवी स्वराज्याचा' हे या महाअधिवेशनाचे घोषवाक्य भगव्या रंगात लिहण्यात आले आहे. तसेच पोस्टरवर आक्रमक मुद्रेतले राज ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे.

हेही वाचा -संजय राऊत यांची हकालपट्टी करा; संभाजी भिडेंची मागणी

या महाअधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर आपल्या पक्षाची पुढची वाटचाल करणार असल्याची भूमिका जाहीर करणार असल्याचे समजते. पक्षाच्या राजकीय विचारधारेसोबतच मनसे आपला नवीन झेंडा देखील हाती घेणार आहे. राज मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाची सांगड घालत पक्षाची पुढची राजकीय वाटचाल करणार आहेत. पोस्टरवर चौरंगी झेंडा नसल्याने पक्षाचा झेंडा बदलला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details