मुंबई :संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात संजय राऊत यांना त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेची सध्याची जी काही स्थिती झाली आहे, त्याला फक्त ते स्वतः जबाबदार नाहीत. यासाठी आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे हे देखील तितकेच जबाबदार असल्याचे संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. सोबतच काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडू लागल्या की, मानसिक स्वास्थ्य ढासाळते, चिडचिड होते, कधीकधी नैराश्याचे झटके देखील येतात. असे म्हणत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
काय आहे पत्रात?संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात म्हटले की, हे येडं** मला का पत्र लिहतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस अटेन्शन सिकिंग होतो. तुम्ही कितीही नाकारलेत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळे हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.