मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन ध्वजावर राजमुद्रेचा वापर करण्यात आला आहे. ध्वजावर राजमुद्रा व रेल्वे इंजिन लावण्याबाबत फार पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसे पत्रही आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगाने आमच्याकडे विचारणा केली असून, त्याला आम्ही योग्य ते उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसवर दिली.
मनसेची 'राज'मुद्रा निवडणूक आयोगाच्या नोटीसला देणार योग्य उत्तर - मनसेने पक्षाच्या अजेंड्याबरोबरच झेंडाही बदलला
मनसेने पक्षाच्या अजेंड्याबरोबरच झेंडाही बदलला आहे. पक्षाच्या नव्या भगव्या झेंड्यावर मनसेनं छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा वापरली आहे. यावरुन राज्य निवडणूक आयोगाने मनसेला विचारपूस केली आहे. त्याला आम्ही योग्य उत्तर देऊ असे वक्तव्य मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केले.
काही संस्था व सामाजिक संघटनांनी ध्वजावर राजमुद्रा असण्याला आक्षेप नोंदवला आहे. म्हणून आमच्याकडे राज्य निवडणूक आयोगाने विचारणा केली आहे. आम्ही उत्तर देऊ त्यावर त्यांचे समाधान होईल, असे सरदेसाई म्हणाले.
मनसेने पक्षाच्या अजेंड्याबरोबरच झेंडाही बदलला आहे. पक्षाच्या नव्या भगव्या झेंड्यावर मनसेनं छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा वापरली आहे. यावर काही संघटनांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मनसेला पत्र पाठवले आहे.