मुंबई -मनसेची पहिली यादी आज (मंगळवार) जाहिर झाली असून त्यात 27 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात महत्त्वाच्या नेत्यांना स्थान दिले असले तरी पहिल्या यादीत वरळी विधानसभेत कोणाच नाव जाहीर केले नाही. यामुळे मनसे वरळीतून उमेदवार देणार का याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहिम मतदारसंघातून संदीप देशपांडे, मागाठाणेतील नयन कदम यांना उमेदवारी दिली आहे. तर सोमवारी मनसेत आलेल्या आत्महत्याग्रस्त धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांना शिंदखेडा व दिलीप दातीर यांना नाशिकमधून उमेदवारी दिली आहे.
आज पहिली यादी जाहीर केली असून उद्यापासून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील. वरळीतून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असले तरी उमेदवार द्यायचा आहे, त्याबाबत अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील असे मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी सांगितले.
यांना मिळाली येथून उमेदवारी
- कल्याण ग्रामीण - प्रमोद रतन पाटील
- कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर
- नाशिक पूर्व - अशोक मुर्तडक
- माहिम - संदीप देशपांडे
- हडपसर - वसंत मोरे
- कोथरूड - अॅड. किशोर शिंदे
- नाशिक मध्य - नितीन भोसले
- वणी - राजू उंबरकर
- ठाणे - अविनाश जाधव
- मागाठाणे - नयन कदम
- कसबा पेठ - अजय शिंदे
- सिंदखेडा - नरेंद्र धर्मा पाटील
- नाशिक पश्चिम - दिलीप दातीर
- इगतपूरी - योगेश शेवरे
- चेंबूर - कर्णबाळा दुनबळे
- कलिना - संजय तुर्डे
- शिवाजीनगर - सुहास निम्हण
- बेलापूर - गजानन काळे
- हिंगणघाट - अतुल वंदिले
- तुळजापूर - प्रशांत नवगिरे
- दहिसर - राजेश येरूणकर
- दिंडोशी - अरूण सुर्वे
- कांदिवली पूर्व - हेमंत कांबळे
- गोरेगांब - विरेंद्र जाधव
- वर्सोवा - संदेश देसाई
- घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
- वांद्रे पूर्व - अखिल चित्रे