मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तर कर्नाटक विधानसभा निवडणुका येत्या 10 मे रोजी होणार आहेत. या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीमावरती भागातील मराठी भाषिक मतदारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी उमेदवारांना मतदान करा, ही संधी दवडू नका असे म्हटले आहे.
राज ठाकरे यांचे आधीचे ट्विट: राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी ट्वीटच्या माध्यमातून मराठी उमेदवारांना मतदान करा असे आवाहन केले होते. मात्र या ट्विटवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत, विविध राजकीय पक्षांमध्ये असलेले मराठी उमेदवार मराठी भाषिकांची कशी गळचेपी करतात हे सांगितले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपले हे ट्विट काढून टाकत नव्याने ट्विटद्वारे संदेश दिला आहे.
काय केले राज यांनी ट्वीट?: राज ठाकरे यांनी पुन्हा नवीन करी सीमा भागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना आवाहन आहे. ही मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना मतदान करा. अन्य पक्षांचे उमेदवार जरी मराठी असले तरी ते निवडून आल्यानंतर मराठी भाषेच्या गळचेपी विरोधात किंवा मराठी माणसांवर सीमा भागात होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात, विधानभवनात तोंड उघडत नाहीत असा अनुभव आहे. तुम्ही ज्या राज्याचे नागरिक आहात त्या राज्याची भाषा तिथली संस्कृती याचा आदर केलाच पाहिजे. ह्या मताचा मी आहे. मात्र सीमा भागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती याचा मान राखत आले आहेत. तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गडचिरोली करणार असेल तर, ते खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही राज यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिला.
कोणतेही सरकार मराठी भाषिकांना मदत करीत नाही: राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मध्यंतरी जेव्हा पुन्हा सीमा वादाला कर्नाटक सरकारने खतवादी घालून वातावरण तापवले तेव्हा आपण स्पष्ट केले होते की, कर्नाटक आणि महाराष्ट्र मुळात एकजन्सीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवत कर्नाटकात आहे तर, अनेक कन्नड तिघांची कुलदैवत महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यातील बंध हा मजबूत आहे. तेव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेऊन संघर्षाची वेळ येऊ देऊ नये. मात्र कुठल्याही सरकार तिकडे आले तरी त्यांच्या वागण्यात येत. किंचितही फरक नसतो म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार जो त्या भागातील मराठी अस्मितेचे प्रतिनिधित्व करेल, अशा मराठी माणसांनाच निवडून द्यायला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रधिकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.