मुंबई- बहूजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते बोईसर विधान सभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आज मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
बहुजन विकास आघाडीला खिंडार; आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश
बोईसर मतदारसंघातील माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे, असे विलास तरे यांनी शिवसेना पक्ष प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली. आमदार विलास तरे
बोईसर मतदारसंघातील माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे, असे विलास तरे यांनी शिवसेना पक्ष प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली. आमदार विलास तरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाई ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला मोठा खिंडार पडला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बोईसरमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, प्रत्येकजण आपल्या पद्धतीने काम करतो. मी कोणावर नाराज नाही, माझ्यावर कोणी नाराज नाही. बोईसर मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात अजून उद्धव ठाकरे यांच्याशी कोणताच विषय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.