महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाले बनले डम्पिंग ग्राउंड, महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल; आमदार राम कदमांचा आरोप - राम कदमांचा पालिकेवर आरोप

वरुणराजाचे आगमन होण्यापूर्वी नालेसफाईचे काम सुरू केल्याचे दावा दरवर्षी प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र, पहिल्याच पावसात पालिका प्रशासनाचा दावा वाहून जातो. यंदाही मोठ्या नाल्याची सफाई झाली नसून नाल्यातील गाळ आजही नाल्यातच आहे. त्यामुळे नाल्यात मोठया प्रमाणात कचऱ्याचे थर दिसत आहेत, जणू डम्पिंग ग्राउंड झाले आहेत, असा आरोप आमदार राम कदम यांनी केला आहे.

mumbai latest news  MLA ram kadam criticized BMC  drainage cleaning mumbai  मुंबई नालेसफाई  मुंबई लेटेस्ट न्युज  राम कदमांचा पालिकेवर आरोप  राम कदमांनी ट्विट केलेला व्हिडिओ
नाले बनले डम्पिंग ग्राउंड, महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल; आमदार राम कदमांचा आरोप

By

Published : Jun 4, 2020, 3:44 PM IST

Updated : Jun 4, 2020, 3:54 PM IST

मुंबई -दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई 90 टक्के झाली, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र, यंदा पावसाळा सुरू झाला आहे, तरी अद्यापही मोठ्या नाल्याची सफाई झालेली नाही. त्याचबरोबर रस्त्यालगतचे बंद नाले साफ करण्यासाठी पालिकेकडे यंत्रणाच नाही. परिणामी यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात मुंबई जलमय झाली आहे. याला प्रशासन जबाबदार आहे. मुंबईचे नाले डम्पिंग ग्राउंड झाले आहेत, असा आरोप आमदार राम कदम यांनी केला आहे.

नाले बनले डम्पिंग ग्राउंड, महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल; आमदार राम कदमांचा आरोप
वरुणराजाचे आगमन होण्यापूर्वी नालेसफाईचे काम सुरू केल्याचे दावा दरवर्षी प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र, पहिल्याच पावसात पालिका प्रशासनाचा दावा वाहून जातो. यंदाही मोठ्या नाल्याची सफाई झाली नसून नाल्यातील गाळ आजही नाल्यातच आहे. त्यामुळे नाल्यात मोठया प्रमाणात कचऱ्याचे थर दिसत आहेत, जणू डम्पिंग ग्राउंड झाले आहेत. सफाई झाल्याचा दावा महापालिका करते. मग ही परिस्थिती कशी काय? अधिकारी काम करत नसतील, तर शिवसेनेची सत्ता आहे त्यांनी हे ताबडतोब करून घ्याला हवे, अशी आमची मागणी आहे. किती खर्च झाला त्याची माहिती लोकांना द्यावी, असेही राम कदम म्हणाले. तसेच आमदार कदम यांनी धारावीचा एक व्हिडिओ ट्विट करत पालिकेचा कारभारावर निशाणा साधला आहे.
Last Updated : Jun 4, 2020, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details