मुंबई- राज्यात जम्बो पोलीस भरती करण्यात येणार आहे. पोलीस दलातील एकूण साडेबारा हजार पदे भरण्यात येणार असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यावर भाजपाने टीका केली आहे, मराठा आरक्षण स्थगिती झाल्यावरच जम्बो पोलीस भरती या सरकारने का सुरू केली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही, तो पर्यंत मेघा भरती कशाला? आगीत तेल टाकत आहात.. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
...तो पर्यंत मेगा भरती कशाला? नितेश राणेंचा सवाल - मराठा आरक्षणावरून नितेश राणे आक्रमक
राज्य सरकारने इतक्या दिवस प्रलंबित असलेली तब्बल १२ हजार पदांची पोलीस भरती करण्यास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. त्यावरून मराठा समाज अधिकच आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनीदेखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणावरील स्थगितीमुळे राज्यातील मराठा युवक-युवतींना नोकरभरती अथवा शिक्षणात लाभ घेता येणार नाही. त्यामुळे आरक्षणावरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाजाची आंदोलने सुरू आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. असे असताना राज्य सरकारने इतक्या दिवस प्रलंबित असलेली तब्बल १२ हजार पदांची पोलीस भरती करण्यास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. त्यावरून मराठा समाज अधिकच आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनीदेखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
'राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती काढली. मात्र, मराठा आरक्षण स्थगित झाल्यावरच का? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागू होत नाही तोपर्यंत मेघा भरती कशाला? सरकार आगीत तेल टाकत आहे मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??' असा परखड सवाल देखील राणे यांनी उपस्थित केला.
लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला होता. शिवाय अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यात काही पोलिसांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी पोलीस दलात नवी भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे ,असे काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. परंतु काही दिवसांआधीच मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष सरकराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच काल घोषणा झालेल्या भरतीवर नितेश राणे यांनी टीका करत प्रश्न उपस्थित केले आहेत.