'...पण सुशांतच्या मृत्यू प्रकरणात 65 दिवस गुन्हा दाखल का झाला नाही?' - MLA Ashish shelar
रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेत सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार केली त्यावरून दोन तासांतच सुशांतसिंह राजपूतच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल झाला. यावरुन भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता सरकारवर टीका केली आहे.
अॅड. आशिष शेलार
मुंबई -सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन अनेक दिवसांपासून वाद विवाद पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे नेते मंडळी महाविकास आघाडीतील नेत्यांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीका करत आहेत. त्यात भाजप नेते आशिष शेलार यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे व महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.