मुंबई:खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना बोरवली दंडाधिकारी न्यायालयासमोर गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात हे दोघे प्रत्यक्ष हजर राहिले नाही. त्यांनी दाम्पत्याने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले की कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्या मुळे कोर्टात हजर राहू शकत नाही. मात्र या दाम्पत्याने त्याच दिवशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांनी एका प्रकारे न्यायालयाची दिशाभूल केली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात सांताक्रूझ पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे. संबंधित न्यायालयाने राणा दांपत्याला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र हे दाम्पत्य हजर राहू शकले नव्हते या प्रकरणात 28 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांनी राणांविरुद्ध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केल्यानंतर अटकेला विरोध आणि पोलिसांना अडथळा केल्याबद्दल आरोपपत्र दाखल केले होते.