मुंबई - मानखुर्द कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. तसेच राज्यातील विविध भागात कोविड व क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल महिला आणि मुलींना विनयभंग, बलात्कारासारख्या गलिच्छ गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. अशात राज्य सरकारने महिला आणि मुलींनी उपचारासाठी कोविड आणि क्वारंटाइन सेंटरला जावं की घरीचं मरावं, हे स्पष्ट करावे, असे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
'महिलांनी उपचारासाठी क्वारंटाइन सेंटरला जावं, की घरीच मरावं?'
मानखुर्द कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. या विषयावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्य सरकारला महिलांनी उपचारासाठी क्वारंटाइन सेंटरला जावं की घरीच मरावं हे स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.
राज्यात भीतीदायक परिस्थिती आहे. भगिनींनी संताप, शोक व्यक्त करत बसायचे आणि डोळ्यांसमोर महिला, मुलींना उद्ध्वस्त होताना पाहायचे. आम्ही एसओपीची मागणी मागील 4 महिन्यापासून सरकारकडे करत आहोत. पण सरकार याकडे लक्ष देत नाही. इतर घटनेत तत्परता दाखवणारे हे सरकार महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर उदासीन का? असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणा पुरतचे का? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा -संतापजनक..! मुंबईत कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक