महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियोजनाअभावी कोट्यवधी रुपयांचा भुगा, मंत्रालयाच्या पायऱ्या तोडण्याला सुरुवात - मंत्रालय

मंत्रालयाच्या पायऱ्या तोडण्याला शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमाराला सुरुवात करण्यात आली. एकंदर पाच अजस्त्र मशीनच्या साहाय्याने हे काम करण्यात येत आहे. तब्बल ८० कर्मचारी या कामाला जुंपण्यात आले आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे काम चालणार असून रविवारी संध्याकाळ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नियोजनाअभावी कोट्यवधी रुपयांचा भुगा, मंत्रालयाच्या पायऱ्या तोडण्याला सुरुवात

By

Published : May 5, 2019, 3:03 AM IST

मुंबई- मंत्रालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर झालेल्या नूतनीकरणात या भव्य पायऱ्या उभारल्या गेल्या होत्या. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव या कोट्यवधींच्या पायऱ्या आता तोडण्याला सुरुवात झाली आहे. नियोजनशून्य कारभारामुळे कोट्यवधी रुपयांचा अक्षरशः भुगा होत आहे.

नियोजनाअभावी कोट्यवधी रुपयांचा भुगा, मंत्रालयाच्या पायऱ्या तोडण्याला सुरुवात

पाच वर्षापूर्वी २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर नूतनीकरणात मंत्रालयाच्या तत्कालीन मुख्य प्रवेशद्वाराजवळ उंच चौथऱ्याप्रमाणे या पायऱ्या बांधल्या होत्या. मुंबईतील प्रसिद्ध एशियाटिक लायब्रेरीच्या धर्तीवर बांधलेल्या या पायऱ्यांचा गेल्या पाच वर्षात काहीही उपयोग झाला नाही. उलट या पायऱ्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अग्निशमन दलाला अडथळा ठरत असल्याचे सुरक्षा यंत्रणेच्या निदर्शनाला आले. आता या पायऱ्या तोडण्याला सुरुवात झाली आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या पायऱ्या तोडण्याला हिरवा कंदील दिला होता. मंत्रालयाच्या आगीनंतर तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयाच्या नूतनीकरणावर तब्बल २०० कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, या पायऱ्या तयार करण्यासाठी नेमका किती खर्च आला, याबाबत माहिती देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने टाळाटाळ केली आहे.

मंत्रालयाच्या पायऱ्या तोडण्याला शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमाराला सुरुवात करण्यात आली. एकंदर पाच अजस्त्र मशीनच्या साहाय्याने हे काम करण्यात येत आहे. तब्बल ८० कर्मचारी या कामाला जुंपण्यात आले आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे काम चालणार असून रविवारी संध्याकाळ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात आघाडी सरकार असताना २०१२ साली लागलेल्या भीषण आगीनंतर मंत्रालयातील मुख्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सुमारे २०० कोटी रुपये खर्च करून मंत्रालयाचे रूपडे पालटण्यात आले. त्याच वेळी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वाराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत प्रसिद्ध अशा एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांसारख्याच पायऱ्या बनवण्यात आल्या. मात्र, गेल्या चार वर्षात याचा कसलाही वापर करण्यात आला नाही. अभ्यागतांना या ठिकाणाहून प्रवेश देण्यात येणार होता. मात्र, आता या पायऱ्याच पोलिसांच्या सुरक्षेला धोका आणि अग्निशमन दलालाही अडथळ्याच्या ठरत आहेत. पुरातत्व विभागानेही मंत्रालयाबाहेरील या पायऱ्यांचा काही उपयोगच नसल्याचे म्हटले आहे. आता या पायऱ्या पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवा कंदील दाखवला असल्याने त्या पाडण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details