महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रातून भाजपने 40 केंद्रीय मंत्री केले तरी राज्यातून शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही - उदय सामंत - Shivsena news

महाराष्ट्रातून 40 केंद्रीय मंत्री केले तरी राज्यातून शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही, असा शब्दात मंत्री उदय सामंत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टिका केली आहे.

उदय सामंत
उदय सामंत

By

Published : Aug 18, 2021, 3:11 PM IST

Updated : Aug 18, 2021, 4:14 PM IST

मुंबई -भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यानंतर आता या यात्रेवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातून 40 केंद्रीय मंत्री केले तरी राज्यातून शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही, असा इशारा सामंत यांनी भाजपला दिला आहे. शिवसेना आमदार सुनील राऊत यांची भेट घेण्यासाठी उदय सामंत आले होते त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

बोलताना मंत्री सावंत

शिवसेना संपू शकत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचा पाढा जन आशीर्वाद यात्रेतून लोकांच्या समोर ठेवण्यात येणार आहे. मात्र, कोरोना काळात सुरू केलेल्या या यात्रेवर शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. 40 मंत्री जरी केंद्र सरकारने महाराष्ट्रमधले केले तरी शिवसेना संपू शकत नाही. जन आशीर्वाद यात्रा याचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही.

भविष्यामध्ये देशाचा देखील नेतृत्व करावे

विरोधकांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले, त्या पद्धतीने करत आहेत. त्या पद्धतीने ते भविष्यामध्ये देशाचेही नेतृत्व करावे, अशा पद्धतीचा कौल या सर्वेमधून आलेला आहे.

कोरोनाचा धोका कायम

कोरोना संपलेला नाही. कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे सर्वांनीच कोविडचे नियम पाळले पाहिजे. खुद्द पंतप्रधानांचीही हीच भूमिका आहे, तीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. जर त्यामध्ये कोणी अतिरेक करत असेल तर प्रशासन त्यांचे काम करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपाची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण, संजय राऊत यांची टीका

कोवीड काळात 'वर्क फ्राॅम होम' काळाची गरज आहे. तुम्ही ऊकिरडे फुंकत फिरत आहात, अशी टीका राऊत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर केली आहे. जन आशीर्वाद यात्रेमुळे तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्याचे काम होणार आहे. काही गरज नसताना ही यात्रा काढली जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना केली होती.

हेही वाचा -100 कोटी वसुली प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत मुभा द्या; अनिल देशमुखांच्या वकिलांची ईडीला विनंती

Last Updated : Aug 18, 2021, 4:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details