मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. राज्यात 1 हजार 346 जणांना कोरोनाची लागन झाली आहे. एकट्या मुंबईत 746 कोरोना रुग्ण आढळले असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये दाटीवटीच्या वस्तीत रुग्ण आढळत असून, आता लॉकडाउन अधिक कडक करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, लॉकडाउन अधिक कडक करणार - राजेश टोपे - rajesh tope news
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. राज्यात 1 हजार 346 जणांना कोरोनाची लागन झाली आहे. एकट्या मुंबईत 746 कोरोना रुग्ण आढळले असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
शहरात पोलीस आपली भूमिका चोख बजावत आहेत. मात्र, दाटीवटीच्या वस्तीत संचारबंदी अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची मदत घेतली जाणार असल्याची माहितीही राजेश टोपेंनी दिली. धारावी, कोळीवाडा आणि अन्य रेड झोन परिसरात अधिकाधिक सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्यात येतो. त्या ठिकाणी एका शौचालयात जवळ जवळ दोनशे जनांकडून वापर करण्यात येतो. त्या ठिकाणी संसर्ग टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात संबंधित परिसर सॅनीटाईज करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेतील अग्निशामक दलाला देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या सोबत चर्चा झाली असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करणं ही मोठी जबाबदारी आहे. ज्या ठिकाणचा परिसर सील करण्यात आला आहे. त्या ठिकाणी खाद्य पदार्थांची तयार पाकिटं पुरवता येऊ शकतात का? यावरही विचार सुरू आल्याचे टोपे यांनी सांगितले.