मुंबई- अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग आहे. कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पूर्वतयारी केली जात आहे. समुद्रात गेलेल्या सर्व बोटी बंदरात परत बोलावून घेतल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून दिली.
चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग - महसूलमंत्री - चक्रीवादळाचा धोका
राज्यावर कोरोनाचे संकट असताना चक्रीवादळाचाही धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासन पूर्व तयारी करत आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. नागरिकांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या सुचनांचे पालन करत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
Last Updated : Jun 2, 2020, 8:26 AM IST